आकुर्डी (चिंचवड) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला खासदार श्रीरंग बारणे यांची सदिच्छा भेट

सनातन संस्थेच्या कार्याविषयी कौतुकोद्गार

खासदार श्रीरंग बारणे (डावीकडून तिसरे) यांचा सत्कार करतांना श्री. पराग गोखले

चिंचवड – नवरात्रोत्सवानिमित्त येथील भवानीमाता मंदिराच्या परिसरात सनातन-निर्मित अनमोल ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला चिंचवड येथील शिवसेनेचे खासदार श्री. श्रीरंग बारणे आणि अधिवक्त्या (सौ.) उर्मिला काळभोर यांनी १ ऑक्टोबरला सदिच्छा भेट दिली. ‘तुमचे कार्य फारच चांगले आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली आणि नवरात्रीविषयीचे हस्तपत्रक अन् विशेषांक भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment