सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी घेतली देहली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची सदिच्छा भेट !

डावीकडून कु. कृतिका खत्री, अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव, श्री. चेतन राजहंस आणि श्री. अभय वर्तक

देहली – सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या हितासाठी कार्य करणारे येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी अधिवक्ता श्रीवास्तव यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांविषयी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि सनातन संस्थेच्या देहलीच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री उपस्थित होत्या.

 

अधिवक्ता अलख श्रीवास्तव यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय

१. देहली येथील चांदनी चौकात असलेल्या मंदिरातील मूर्ती तोडण्यात आल्याच्या प्रकरणी अधिवक्ता श्रीवास्तव यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली.

२. अधिवक्ता श्रीवास्तव यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांच्या (‘सोशल मिडिया’च्या) माध्यमातून भारतविरोधी प्रचार करणार्‍या जम्मू-काश्मीरमधील नेत्या शैला रशीद यांच्या विरोधात चळवळ राबवली. याविषयीचा प्रथम माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) देहली पोलिसांनी नुकताच प्रविष्ट केला आहे.

३. अधिवक्ता श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याचा आदेश दिला.

क्षणचित्र

या भेटीच्या वेळी अधिवक्ता श्रीवास्तव म्हणाले, ‘‘तुम्ही फार चांगले कार्य करत आहात. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी प्रसारमाध्यमांतून मी पूर्वीपासूनच वाचत आलो आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment