दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

श्री. मोहन दाते (डावीकडे) यांना सनातन प्रभातविषयी माहिती देतांना श्री. अमोल हंबर्डे

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – सोलापूर येथील दाते पंचांगकर्ते श्री. मोहन धुंडीराजशास्त्री दाते यांनी ८ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली.

याप्रसंगी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी श्री. दाते यांचा शाल, श्रीफळ आणि श्रीगणेशाची प्रतिमा देऊन सत्कार केला. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख ‘ज्योतिष फलित विशारद’ सौै. प्राजक्ता जोशी आणि सनातनचे साधक उपस्थित होते.

 

आश्रमभेटीमुळे सनातनच्या कार्याचे महत्त्व कळले ! – श्री. मोहन दाते

सनातनचे कार्य माहीत होते; पण आज आश्रमात येऊन कार्याची माहिती घेतल्याने सनातनच्या कार्याचे महत्त्व कळले. अनेक वर्षांपासूनची इच्छा आज सनातन आश्रमाच्या भेटीने पूर्ण झाली आणि समाधान वाटले. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शनही विलक्षण आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment