सनातनच्या प्रदर्शनस्थळी सुगंध आणि प्रसन्नता जाणवते ! – सौ. मेधा कुलकर्णी, भाजप आमदार, पुणे

प्रदर्शन पहातांना (डावीकडे) आमदार सौ. मेधा कुलकर्णी

पुणे – रामनवमी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराच्या समोर सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला कोथरूडच्या भाजप आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी भेट दिली. ‘प्रदर्शनस्थळी सुगंध येत आहे. मला प्रसन्न वाटले’, असे त्यांनी सांगितले. या वेळी तेथे सनातनचे पू. पद्माकर होनप यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment