राष्ट्र आणि धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या सनातनसारख्या संस्थांच्या विचारांचा प्रचार आम्ही सतत करणार ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे

ह.भ.प. मांडकेबुवा यांना ग्रंथ भेट देतांना श्री. प्रदीप तवटे

कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) – सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसारख्या संस्था सांगत असलेली राष्ट्र आणि धर्म यांविषयीची भाकिते सत्य ठरत आहेत अन् ती सत्यच ठरतील. त्यामुळे या संस्थांची धर्मविषयक पुस्तके, ग्रंथ वाचा ! देव, देश  आणि धर्म संरक्षणाचे कार्य करणार्‍या संस्थांच्या विचारांचा प्रसार आम्ही सतत करू, असे उद्गार पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके यांनी हुमरमळा, वालावल येथे कीर्तन कार्यक्रमात काढले.

तालुक्यातील हुमरमळा, वालावल येथील श्री देव रामेश्‍वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ह.भ.प. मांडकेबुवा यांचे कीर्तन झाले. या वेळी कीर्तनात ह.भ.प. मांडकेबुवा पुढे म्हणाले…

१. वर्ष २०१४-१५ मध्ये मी याच ठिकाणी सनातन संस्थेच्या ग्रंथातील वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या परिस्थितीचे वर्णन केले होते. ते सर्व आज सत्य ठरत आहे.

२. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संस्था धर्माचे कार्य निरपेक्षपणे करत आहेत. त्यामुळे हे कार्य जाणून घ्या !

३. कीर्तन हे समाजप्रबोधन आणि जनजागृतीचे माध्यम असल्याने आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून यापुढेही हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार करत रहाणार ! आम्ही राष्ट्र आणि धर्म यांविषयी जनजागृती करतो, म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार आहोत.

क्षणचित्रे

१. सनातन संस्थेच्या विचारांचे महत्त्व मांडकेबुवा सांगत असतांना श्रोते टाळ्या वाजवून त्यांना अनुमोदन देत होते.

२. पाट येथील सनातनचे साधक श्री. प्रदीप तवटे यांनी श्री. मांडकेबुवा यांची भेट घेऊन त्यांना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, हा ग्रंथ भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment