महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

  • विविध राज्ये आणि गावांत प्रदर्शन लावण्याची संतांसह जिज्ञासूंची मागणी !
  • सनातनच्या धर्मकार्यात सहभागी होण्याची अनेक जिज्ञासूंची सिद्धता !
  • सनातनचे विषय पाठ्यपुस्तकात घेऊन इतर गावांत प्रदर्शन लावण्याची जिज्ञासूंची मागणी !

सनातन संस्थेचा प्रदर्शन मंडप हा सेक्टर क्रमांक १९, मोरी मुक्ती मार्ग या मार्गावर प्रारंभीच आहे. या सेक्टरमध्येच जवळपास सर्वच आखाडे आहेत. त्यामुळे हा भाग नेहमीच गजबजलेला असतो आणि महत्त्वाचा आहे. सनातन संस्थेचे फलक आणि ग्रंथ, सात्त्विक वस्तू यांचे प्रदर्शन याच ठिकाणी प्रत्येक कुंभमेळ्याच्या कालावधीत असते. हे प्रदर्शन सर्वांत आधी उभे राहिले आहे. १२ जानेवारी या दिवशी महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. येथे भाविक आणि जिज्ञासू यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या ठिकाणी हिंदु धर्माभिमानी जुगल किशोर तिवारी या भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकार्‍यांनी ‘गंगा नदीचे महात्म्य’ या हिंदी ग्रंथाची मागणी त्यांच्या ‘नदी संवाद’ या कार्यक्रमात दर्शकांना वितरित करण्यासाठी केली.

या कक्षावर सर्वच भाषिक ग्रंथांचे वितरण अधिक आहे. या भाषांमध्ये बंगाली, गुजराती, इंग्रजी, कन्नड या भाषांतील ग्रंथांना चांगला प्रतिसाद आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन चालू असते. २४ जानेवारीपर्यंत १५ सहस्र २०० हून अधिक जिज्ञासूंनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे. भाविक येथे लावलेल्या धर्मशिक्षण फलकांची छायाचित्रे काढून घेतात आणि त्याचे भ्रमणभाषवर ध्वनीचित्रीकरणही करतात.

सनातन संस्थेचे दुसरे प्रदर्शन सेक्टर क्रमांक ९ येथे १४ जानेवारी या दिवशी शांभवी पीठाचे आणि काली सेना या संघटनेचे प्रमुख श्री आनंद स्वरूप महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. असे असले, तरी १० जानेवारीला प्रदर्शन काही प्रमाणात लावत असतांना काही सात्त्विक वस्तूंच्या मोजणीसाठी प्रदर्शन उघडले होते. त्या दिवशी रात्री ८ वाजताच जिज्ञासूंनी प्रदर्शन पहाण्यास गर्दी करायला प्रारंभ केला. तेव्हापासून प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद आहे. कुंभनगरीतील कलश द्वाराजवळच हे प्रदर्शन उभे आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर १० दिवसांत १५ सहस्र ५०० हून अधिक जिज्ञासूंनी भेट दिली.

 

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाची पहाणी करतांना जिज्ञासू (डावीकडे) काली सेनेचे प्रमुख प.पू. आनंद स्वरूप महाराज आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

इस समय @HinduJagrutiOrg के धर्मप्रसारक सद्गुरु नीलेश सिंगबाल जी @Nilesh_C13 की भी वंदनीय उपस्थिति रही । pic.twitter.com/ILqvsPoU1g

— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 17, 2025

 

श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांची महाकुंभपर्वातील सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट !

परात्पर गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेला नमस्कार करतांना श्री. प्रमोद मुतालिक

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथील सेक्टर ९, गंगेश्वर कैलाशपुरी चौक, कैलाशद्वार येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन संस्कृती आणि ग्रंथ प्रदर्शना’ला भेट दिली. या वेळी सनातनच्या साधकांनी त्यांना प्रदर्शनात लावलेल्या फलकांची माहिती दिली. या प्रदर्शनातील तीर्थक्षेत्रांविषयी लावलेल्या फलकांविषयी मुतालिक यांनी जिज्ञासेने जाणून घेतले.

महाकुंभात इंडोनेशिया येथील ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’च्या सदस्यांची सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला सदिच्छा भेट  !

डॉ. धर्म यश इंडोनेशिया येथील भाषेत त्यांच्या सदस्यांना प्रदर्शनातील प्रत्येक फलकांवरील माहिती समजावून सांगतांना

प्रयागराज, १६ जानेवारी (वार्ता.) : सनातन संस्कृती प्रदर्शनच म्हणजे एक नवीन समुद्रमंथन आहे. समुद्रमंथन अशा दृष्टीने की, सनातन संस्था वैज्ञानिक आणि शास्त्रीय परिभाषेत संशोधन करून धर्माचरणाच्या प्रत्येक कृतीमधील शास्त्रीय कारण प्रमाण देऊन सांगते. या कारणास्तव मी त्याला ‘समुद्रमंथन’ असे म्हटले आहे, असे प्रतिपादन बाली (इंडोनेशिया) येथील ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. धर्म यश यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी वंदनीय उपस्थिती लाभली.

महाकुंभ पर्वातील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला डॉ. धर्म यांसह ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’च्या सदस्यांनी १४ जानेवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रदर्शन पाहून सर्व सदस्य भारावून गेले. सर्वांनी मोठ्या जिज्ञासेने प्रदर्शनातील फलकांवरील धर्मशिक्षण, अध्यात्म, राष्ट्र यांविषयीची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे डॉ. धर्म यश यांनी इंडोनेशिया येथील भाषेत त्यांच्या सदस्यांना प्रदर्शनातील प्रत्येक फलकांवरील माहिती समजावून सांगितली.

सनातनचे कार्य भारतासह जगभर पसरायला हवे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी संवाद साधतांना डॉ. धर्म यश (डावीकडे)

डॉ. धर्म यश म्हणाले, ‘‘आपण एखादी कृती करतांना एवढा सखोल विचार कधी करत नाही. वेदांवर आपला विश्वास आणि श्रद्धा असते. आजकाल सर्वत्र धर्माविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे धर्माचरण करतांना वैज्ञानिक प्रमाण दिल्यास लोक लगेच विश्वास ठेवतात. सनातन संस्था ही वैज्ञानिक आणि शास्त्रीय परिभाषेत संशोधन करून धर्मशिक्षण आणि धर्माचरण करण्यास सर्वांना उद्युक्त करत आहे. म्हणूनच सनातन संस्थेचे कार्य एकमेवाद्वितीयच आहे. हे कार्य भारतासह जगभर पसरायला हवे.’’

सनातन संस्था धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे ! – धर्मगुरू प.पू. श्री अमृताश्रम स्वामी, बीड, महाराष्ट्र

धर्मगुरू प.पू. श्री अमृताश्रम स्वामी

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्था धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे, असे कौतुकोद्गार बीड येथील धर्मगुरु प.पू. श्री अमृताश्रम स्वामी यांनी केले. प.पू. स्वामीजींनी सनातनच्या वतीने सेक्टर क्रमांक १९ येथील मोरी मार्गावर लावण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

प.पू. स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘महाकुंभपर्वात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले सनातनचे ग्रंथप्रदर्शन सनातन धर्मीय लोकांनी येऊन अवश्य पहावे. भारतीय संस्कृती, संतांची परंपरा आदींविषयीची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. यासह तरुण वर्ग, महिला, विद्यार्थी यांनी धर्माचरण कसे करायला हवे ?, हेही या  प्रदर्शनात पहाया मिळते. यातून सर्वानं शिकावे. सनातन संस्थेशी माझा पूर्वीपासून परिचय आहे आणि तो यापुढेही राहील. सनातन संस्था सनातन धर्मासाठी उत्तम कार्य करत आहे. जे कार्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप या सर्वांनी केले, ते कार्य सनातन संस्था करत आहे. सनातनचे साधक उच्चशिक्षित असतांनाही ते स्वतःचा संसार, घर सोडून संन्याशाप्रमाणे सनातनसाठी अखंड त्याग करत आहेत. या साधकांना माझ्या शुभेच्छा आणि साधकांनी असेच कार्य करत रहाण्यासाठी ईश्वराने साधकांना आशीर्वाद द्यावा, अशी मी प्रार्थना करतो.

सुदर्शन वाहिनी’चे संपादक सुरेश चव्हाणके आणि शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची सपत्नीक कुंभमेळ्यातील सनातनच्या प्रदर्शनाला भेट !  सनातन संस्थेच्या धर्मप्रचारकार्याचे केले कौतुक !

‘सुदर्शन न्यूज’च्या डॉ. सुरेश चव्हाणके यांच्याकडून सनातन संस्थेच्या प्रदर्शनकक्षाचे छायाचित्रीकरण !

डॉ. सुरेश चव्हाणके प्रदर्शनाची माहिती सांगत त्याचे चित्रीकरण करून घेतांना
साधकांशी चर्चा करतांना डॉ. सुरेश चव्हाणके

 

सर्वांनी एकत्र येऊन आणि संकल्प करून सनातन धर्माचा प्रचार करायला हवा ! – श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय संन्यासी संगम

श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर
श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर

प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – धर्मशिक्षण प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करून सनातन संस्था मोठ्या मानाने प्रसाराचे विस्तृत कार्य करत आहे. घराघरांत जाऊन सनातन धर्माचे पालन करण्याविषयी सांगणे आवश्यक आहे. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी सनातन संस्थेने संकल्प केला आहे. सनातन धर्म नसेल, तर एकही घर रहाणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन आणि संकल्प करून सनातन धर्माचा प्रचार करायला हवा, असे मार्गदर्शन ‘अखिल भारतीय संन्यासी संगमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर यांनी केले. कुंभक्षेत्री लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास त्यांनी भेट देऊन प्रदर्शन पाहिले. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज यांचे प्रदर्शनाच्या ठिकाणी आगमन होताच सनातनच्या साधिकांनी त्यांचे पाद्यपूजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी वंदनीय उपस्थित होती. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांना ‘धर्मशिक्षा फलक’ आणि ‘गुरुका आचरण, कार्य एवं गुरुपरंपरा’ हे हिंदी भाषेतील २ ग्रंथ भेट दिले.

श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर म्हणाले, ‘‘सनातनच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करणारे सर्व साधक चांगले प्रयत्न करत आहेत. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अखंड भारत देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सनातन धर्माचे रक्षण करण्याचा विचार केला पाहिजे. सनातन धर्माचे आचरण करण्यात येणार्‍या अडचणी दूर करून ते आचरण करण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत आहे. ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सनातनचा प्रचार करत आहे. सनातन धर्माचे कसे आचरण करायला हवे ? कसे आणि काय बोलायला हवे ? याची माहिती संस्थेद्वारे दिली जाते. त्याविषयी ही संस्था सर्वांना जागृत करून योग्य कार्य करण्यास प्रवृत्त करत आहे.’’

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनातून भाविकांना धार्मिक ज्ञान आणि नवी दिशा मिळेल ! – भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह

ग्रंथ प्रदर्शनाच्या वेळी संवाद साधताना (डावीकडे) आमदार श्री.टी. राजासिंह, (उजवीकडे) सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. चेतन राजहंस आणि इतर मान्यवर

प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेकडून महाकुंभ प्रयागराज येथे धर्म प्रचार-प्रसारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. पूजा करण्याची पद्धत काय ? कुंभक्षेत्री स्नान कसे करावे? त्याचे महत्त्व काय ? घरात देवघर कुठे असावे ? याविषयी माहिती देणारे हे ग्रंथ प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. त्यांनी अवश्य सनातनचे ग्रंथ प्रदर्शन पहावे, असे मी भाविकांना आवाहन करतो. याठिकाणी आपणास धार्मिक ज्ञान, साधनेविषयी मार्गदर्शन मिळेल. त्यातून आपल्या जीवनाला नवी दिशा मिळून जीवनात परिवर्तन होईल, असे प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी येथे केले.

कुंभक्षेत्री सेक्टर १९ येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण प्रदर्शनास श्री.टी. राजासिंह यांनी २७ जानेवारी या दिवशी भेट देऊन प्रदर्शनाची पहाणी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी श्री. टी. राजासिंह यांना प्रदर्शनाची माहिती देऊन त्यांच्याशी इतर विषयांवर संवाद साधला.

ऋषिकेश येथील ‘गीता भवन’चे गौरीशंकर मोहता यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रतिमेला घातला मखानाचा हार !

छायाचित्रात डावीकडून श्री. लुकतुके, श्री. गौरीशंकर मोहता, श्री. शर्मा, मध्‍यभागी मखानाचा हार घातलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा, श्री. कासट आणि श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

प्रयागराज – ऋषिकेश येथील गीता भवनचे श्री. गौरीशंकर मोहता यांनी मखाना आणि वेलदोडे यांनी बनवलेला हार सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रतिमेला घातला. महाकुंभनगरीत सनातन संस्‍थेच्‍या सेक्‍टर क्रमांक ९ येथील मंडपातील प्रतिमेला हा हार घातला. यातून श्री. गौरीशंकर मोहता यांचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रतीचा भाव यातून दिसून आला.

हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी ! – सतीश कुमार, गौरक्षा दल

श्री. सतीश कुमार (डावीकडून तिसरे) यांना नियतकालिक ‘सनातन प्रभात’ भेट देतांना श्री. महेश पाठक (डावीकडून दुसरे), समवेत श्री. सतीश कुमार यांचे सहकारी

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचा मला १४-१५ वर्षांपासून परिचय आहे. मी देशवासियांना सांगू इच्छितो की, जेव्हा कुणाच्या मनातही हिंदु राष्ट्राविषयी विचार नव्हते, त्या वेळी भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी संस्था होती. आज तीच मागणी प्रत्येक सनातनी हिंदूच्या मुखावर आहे. प्रत्येक जागरूक हिंदूला ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असे वाटत आहे.

संत-महंतही आता हिंदु राष्ट्राविषयी बोलत आहेत. गौरक्षा दलाचा हा दृढ विश्‍वास आहे की, हिंदु राष्ट्र झाल्यानंतर देशातील गोहत्या निश्‍चित थांबेल. सर्व हिंदु बांधवांना माझे आवाहन आहे की, सनातन संस्थेच्या सेक्टर ९ मधील प्रदर्शनकक्षाला अवश्य भेट द्यावी. हे प्रदर्शन पाहून एका सनातनी हिंदूने जीवन कसे जगावे ? याची माहिती सर्वांना मिळेल, असे मत गौरक्षा दलाचे श्री. सतीश कुमार यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेच्या प्रदर्शनकक्षाला त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या समवेत भेट दिली. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सनातन संस्थेच्या वतीने श्री. महेश पाठक यांनी श्री. सतीश कुमार आणि त्यांच्या सहकारी यांनी नियतकालिक ‘सनातन प्रभात’ भेट दिले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ सर्वांनी वाचायला हवेत ! – वेदमूर्ती महेश दुबे, अध्यापक, श्रीदिगंबर वेद विद्यालय, प्रयागराज

प्रदर्शन कक्षाविषयी मनोगत सांगतांना विद्यार्थ्यांसह ‍वेदमूर्ती. महेश दुबे

प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचा कक्ष बाहेरून दिसल्यानंतर माझ्या मनात आले की, एकदा तरी हा कक्ष पहावा. त्यानुसार आम्ही सर्व आज प्रदर्शन पहायला आलो. अगदी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत दिनचर्या कशी असायला हवी ? हे या प्रदर्शनात सांगितले गेले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी स्वतः ग्रंथांचे संकलन केले आहे. त्यांचे ग्रंथ निश्‍चित सर्वांनी वाचायला हवेत, असे मत येथील ‘श्रीदिगंबर वेद विद्यालया’चे अध्यापक वेदमूर्ती श्री. महेश दुबे यांनी केले. सनातन संस्थेच्या सेक्टर ९ मधील प्रदर्शनकक्षाला त्यांनी भेट दिली. ‘श्रीदिगंबर वेद विद्यालया’ हे विद्यालय श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.

श्रीदिगंबर वेद विद्यालयाचा विद्यार्थी

या वेळी श्रीदिगंबर वेद विद्यालयाचे २० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. त्यांपैकी एका विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हिंदु धर्म हाच एकमात्र धर्म असून अन्य सर्व पंथ आहेत. सर्वांनी धर्माचे पालन करायला हवे. सनातन संस्थेने लावलेले प्रदर्शन पुष्कळ सुंदर आहे. मी त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे.

कुंभमेळ्यातील सनातनचे प्रदर्शन पहाताच युवतींकडून धर्माचरणाला प्रारंभ !

सनातन संस्थेच्या साधिकांकडून कपाळावर कुंकु लावून घेतांना युवती
सनातनची सात्त्विक उत्पादने घेतांना भाविक

महाकुभंमेळ्यात येणारा तरुण वर्ग मोठ्या संख्येने या प्रदर्शनाकडे आकर्षित होत असतांना दिसून येत आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी प्रयागराज येथील कु. रचना पाल, कु. नंदीनी पाल आणि कु. अंकिता आर्या या आल्या होत्या. त्यांना येथे कपाळावर कुंकु लावून धर्माचरण करण्याविषयीचे महत्त्व सांगण्यात आले. हे महत्त्व पटल्यामुळे त्या युवतींनी तत्परतेने प्रदर्शनाच्या ठिकाणीच कपाळावर कुंकु लावले. तरुणवर्गातील अनेकांनी धर्माचरणाविषयी या गोष्टी त्यांना सनातनच्या प्रदर्शनातून समजल्या, असे व्यक्त केले. सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी करण्यासाठीही भाविकांची गर्दी होत आहे.

बंगाली नागरिकांनी ग्रंथप्रदर्शनाला दिलेली भेट

महाकुंभमेळ्यात सनातनच्या ग्रंथांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हिंदु धर्माचे शिक्षण सोप्या, सुलभ आणि शास्त्रीय भाषेत देणारी सनातनची ग्रंथसंपदा जिज्ञासूंना आकर्षित करत आहे. ग्रंथप्रदर्शन चालू झाल्यापासून १० जानेवारी ते २ फेब्रुवारी या १४ दिवसांच्या कालावधी कुंभमेळ्यातील मोरी-मुक्ती चौकातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला २५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये भारतातील सर्व राज्यांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, कॅनडा, इंडोनेशिया, मलेशिया या देशातील नागरिकांचा समावेश आहे. ग्रंथप्रदर्शन पाहून जिज्ञासू इतके प्रभावित होत आहेत की, काही जिज्ञासू स्वत:च्या भाषेतील ग्रंथांचा सर्व संचाची मागणी करत आहेत. काही जिज्ञासूंनी त्यांच्या राज्यांमध्ये सनातनच्या ग्रंथ वितरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. अनेकांनी ग्रंथ घेतल्यावर अन्य ग्रंथांच्या मागणीसाठी सनातनचे संकेतस्थळ आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक मागून घेत आहेत. हिंदी, बंगाली, कन्नड आणि मराठी भाषेतील ग्रंथांना विशेष प्रतिसाद लाभत आहे.

महाकुंभमेळ्यात सनातनच्या साधकांकडून ई रिक्शाद्वारे अध्यात्मप्रसार !

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यामध्ये ई रिक्शाद्वारे सनातन संस्थेकडून अभिनव पद्धतीने अध्यात्मप्रसार केला जात आहे. ई रिक्शाला ‘ग्रंथ प्रदर्शना’चे स्वरूप देऊन त्यामध्ये सनातनच्या अध्यात्म, राष्ट्र-धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार आदी विविध भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. यासह सनातनची सात्त्विक उत्पादनेही ‘ई रिक्शा’मध्ये आहेत. सध्या ही ‘ई रिक्शा’ सेक्टर २० मध्ये श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या बाहेर कार्यरत आहे. भाविकांच्या गर्दीनुसार विविध भागांमध्ये ही रिक्शा जाते. नियमित सकाळी ९.३० ते रात्री ८.३० या वेळेत या ई रिक्शाद्वारे प्रभावीपणे आध्यात्मप्रसार चालू आहे.

सनातनचे प्रदर्शन पहाणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय असे…!

१. आचार्य डॉ. तन्मयानंद, श्रीशक्तिन्यास, शक्ति विहार, श्रीकोणा बालेश्‍वर, ओडिशा – सनातन धर्म संस्कृतीचे शास्त्रीय परिभाषेतील प्रस्तुतीचे हे प्रदर्शन सनातन धर्मासाठी सुरक्षाकवच प्रदान करत आहे. आमच्या ओडिशातील आश्रमात याविषयी शिबीर आयोजित करू शकतो. आमच्या भागातील धर्मांतराच्या समस्यांच्या विरुद्ध आपण एकत्र कार्य करू शकतो.

२. श्री. विशाल दुबे, नवीन झुसी, प्रयागराज, उत्तरप्रदेश – मी हे प्रदर्शन पाहिल्यावर पुष्कळ प्रभावित झालो आहे. यात पुष्कळ छान माहिती आहे. मी स्वतः एक सनातनी असून आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो.

३. श्री. दिवाकर पांडेय, वाराणसी, उत्तरप्रदेश – हिंदूंना जागृत करण्यासाठी आवश्यक असलेले असे हे प्रदर्शन पाहिल्यावर मी आश्‍चर्यचकित झालो आहे. मी तन, मन आणि धन अर्पण करून आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो.

४. श्री आनंद महाराज हाळे, शिवभक्ती पारायण, नांदेड, महाराष्ट्र – सनातन संस्थेची ग्रंथसंपदा सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक आहे. हे ग्रंथ तळागळापर्यंत, तसेच प्रत्येक तालुक्यात पोचायला हवेत.

५. आचार्य रामायण प्रसाद, पटवारी आश्रम, रिगा, मध्यप्रदेश – हे प्रदर्शन पाहून चांगले वाटले. देशात अनेक अनावश्यक गोष्टींवर पैसे व्यय केेले जात आहेत. त्याहून अधिक चांगले सनातन संस्था चांगले कार्य करत आहे. खरेतर हिंदु राष्ट्रासाठी पैसे व्यय केेले पाहिजेत.

६. श्री. सुनील कुमार शुक्ला, बिद्दिया, नवाबगंज, प्रयागराज, उत्तरप्रदेश – अतिशय आकर्षकपणे ग्रंथ प्रदर्शने लावले आहे. तुम्ही धर्मजागृतीचे कार्य करता, हे कौतुकास्पद आहे. पुष्कळ वेळ देऊन प्रदर्शन लावण्याची सेवा करणार्‍या सर्व साधकांचा उत्साह मोठा आहे.

७. हिमांशु, नवाबगंज, बरेली, उत्तरप्रदेश, स्वामी सोम प्रकाश महाराज, संधौड, पंजाब – हे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आनंद झाला. माझी सनातनच्या कार्याशी जोडण्याची इच्छा आहे. माझ्या जिल्ह्यातही हे प्रदर्शन लावावे !

८. श्री. अनुराग तिवारी, प्रयागराज, उत्तरप्रदेश – प्रत्येक व्यक्तीने वेळ काढून सनातनचे प्रदर्शन पाहून सनातन संस्कृतीला समजून घेतले पाहिजे. हे प्रदर्शन अद्भूत आणि सुंदर आहे. यातून पुष्कळ शिकायला मिळाले. ईश्‍वराने या संस्थेला पुढे न्यावे.

९. गायत्री गिरि, जुना आखाडा, श्रीनगर, गुजरात – माझी सनातनच्या कार्याचा प्रचार करण्याची इच्छा आहे !

१०. श्री. जिले सिंह, भिपाली, हरियाणा – प्रदर्शन पाहून आनंद झाला. आपण सर्व एकत्र येऊन सनातनचा प्रचार करण्याचे कार्य करूया !

११. श्री. रसिक लोचन पांडे, ओडिशा – माझी हिंदु राष्ट्र कार्याशी जोडायची इच्छा आहे. मी स्वतः बालसंस्कार वर्ग घेतो.

१२. श्री. राजेश साहू आणि श्री. फुलचंद्र विश्‍वकर्मा, ललितपूर, उत्तरप्रदेश – मला सनातन संस्थेशी जोडून कार्य करण्याची इच्छा आहे !

१३. अधिवक्ता पवन कुमार खनुरिया, जम्मू – सनातनचे प्रदर्शन पाहून चांगले वाटले. हे कार्य करत असल्याविषयी सनातनच्या साधकांना धन्यवाद देतो.

१४. श्री. कुलदीप कुमार, प्रयागराज, उत्तरप्रदेश – हे प्रदर्शन पाहिल्यानंतर धर्म, कर्म, पूजा तथा स्नान कसे करायचे ?, दानाचे महत्त्व याची संपूर्ण माहिती मिळाली. या प्रदर्शनातून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

१५. रुपाली अग्रवाल, हरियाणा – वर्तमान काळात सनातन संस्कृतीचे ज्ञान लुप्त होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून संस्कृतीला पुर्नसंस्थापित करण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.

१६. श्री. मदन मोहन पंडा, ओडिसा – हिंदु राष्ट्र कार्याशी माझी जोडण्याची इच्छा आहे.

१७. श्री. मुकुंद लाल, प्रयागराज, उत्तर प्रदेश – मी साधनेविषयी माहिती हवी आहे, तसेच मला साधना करण्याची इच्छा आहे.

१८. श्री. प्रेमचंद मूंड, राजस्थान – मला सनातन संस्थेचा सदस्य व्हायचे आहे. तुम्ही चांगले कार्य करत आहात. माझ्या गावी मी निष्कामपणे आयुर्वेदीक औषध देऊन रुग्णांवर उपचार करतो. तसेच लोकांना चांगले संस्कार, स्वास्थ, उत्तम ज्ञान आणि रोजगार देण्याविषयी माहिती देतो.

१९. श्री. अमित गुप्ता, जम्मू काश्मीर – प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. सनातन संस्थेची शाखा जम्मू येथे असावी, असे मला वाटते.

२०. श्री. मनोज कुमार, हरियाणा – प्रदर्शन पुष्कळ प्रभावी आहे. सनातनच्या कार्याशी जोडून तुम्हाला साहाय्य करण्याची माझी इच्छा आहे.

२१. नीता बग्गा, लक्ष्मणपुरी (लखनौ) – प्रदर्शन चांगले आहे. सर्व कार्यकर्ते सज्जन आणि महिला या मृदूभाषी आहेत.

२२. डॉ. प्रदीप – धर्मशास्त्राविषयी क्रमबद्ध पद्धतीने चांगले मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे अल्प वेळेत चांगली माहिती मिळाली.

२३. श्री. नरेंद्र बहाद्दुर सिंह, निवृत्त प्रबंधक, ग्रामीण बँक, प्रतापगड, उत्तरप्रदेश – अन्य राज्यांमध्येही असे प्रदर्शन लावले पाहिजे. त्यामुळे हिंदूंना ज्ञान मिळेल. प्रदर्शनाचे ठिकाण लहान असूनही पुष्कळ उपयुक्त माहिती सांगितली आहे. सर्व आखाड्यांमध्ये असे प्रदर्शन लावले पाहिजे. यातून धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.

२४. श्री. लक्ष्मीनारायण कुम्‍बारिया, पंजाब – गायीचे वासरू ज्‍या प्रकारे प्रचंड गर्दीतूनही स्‍वत:च्‍या आईला शोधते, त्‍याप्रमाणे माझेही भाग्‍य आहे की, मी सनातन संस्‍थेच्‍या प्रदर्शनात आलो. ‘सनातन’साठी जगणे, हेच आपले जीवन असायला हवे. सनातन धर्म म्‍हणजे काय आहे ? सनातन धर्म किती व्‍यापक आहे ? हे प्रदर्शन पाहून सर्वांना निश्‍चित समजेल. सर्वांनी हे प्रदर्शन निश्‍चित पहावे.

 

Leave a Comment