अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा सनदी लेखापाल वरदराज बापट यांची सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट

डावीकडून आश्रमाची माहिती देतांना सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत, श्री. वरदराज बापट आणि अन्य मान्यवर

फोंडा – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा नौपाडा, ठाणे येथील सनदी लेखापाल श्री. वरदराज बापट यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. ते सनातनचे हितचिंतक आहेत. त्यांच्या समवेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्थानिक कार्य करणारे श्री. विश्‍वेश पुराणिक, तसेच अभिदीप विष्णु देसाई हेही उपस्थित होते.

श्री. बापट हे उच्चशिक्षित असून त्यांनी अर्थशास्त्रात पीएच्डी केली आहे. सध्या ते आय.आय.टी. मुंबईमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पूर्ण आश्रम पाहून झाल्यावर त्यांनी ‘सनातनचे कार्य उत्तम आहे. आश्रम पाहून प्रसन्नता वाटली. येथे शिस्त, स्वच्छता, काटेकोरपणा अप्रतिम असून आश्रमात आनंदी वाटते’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात