देवद (पनवेल) येथील युवा साधक प्रशिक्षण शिबिर

आपल्यात साधकत्व निर्माण होण्यासाठी
गुणांची जोपासना करा ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

शिबिरात सहभागी युवा साधक आणि मध्यभागी १. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

देवद (पनवेल), २१ नोव्हेंबर (वार्ता.) – आपल्याला ईश्‍वरप्राप्ती जलदगतीने करायची, असेल तर आपण साधक बनायला हवे आणि साधकत्वाचे गुण आपल्या अंगी असणे आवश्यक आहे. साधक हा नम्र, इतरांचा विचार करणारा, स्वतःची चूक स्वीकारणारा, सत्य बोलणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, व्यष्टी साधना तळमळीने करणारा असतो. म्हणूनच आपल्यात साधकत्व येण्यासाठी गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी युवा शिबिरार्थींना केले. सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ’युवा साधक प्रशिक्षण’ शिबिराची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी श्री. मनीष माळी यांनी हिंदु राष्ट्राची व्यापक संकल्पना स्पष्ट केली.

श्री. माळी या वेळी म्हणाले, ‘‘आज लोकशाही राज्यात हिंदूंवर होणारे अन्याय, गोहत्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, सैनिकांची अवहेलना, स्त्रियांवरील अत्याचार, मंदिरांची लूट, संतांवर खोटे आरोप, लव्ह जिहाद आदी समस्यांवर कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. हिंदु राष्ट्र प्रभु श्रीरामाच्या, छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर चालेल आणि त्यामध्ये सत्त्वगुणी लोक असल्याने अशा समस्या नसतील.

अन्य !

१. या शिबिरात आनंदी जीवनासाठी ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ आणि नियोजन कौशल्याचा विकास कसा करावा, हे शिकवण्यात आले आणि पुढील धर्मप्रसार सेवेचे नियोजन करण्यात आले.

२. युवा साधकांनी स्वतःचे दोष शोधून त्यावर स्वयंसूचना सत्रे सिद्ध केली.

३. युवा साधकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका प्रांजळपणे सर्वांना सांगितल्या आणि फलकावर लिहिल्या.

युवा साधकांचा भावपूर्ण प्रतिसाद !

या वेळी युवा साधकांनी ‘या शिबिरामुळे उत्साह निर्माण होऊन आनंद मिळाला’, असे मनोगत व्यक्त केले. आश्रमातून घरी जाण्यासाठी निघतांना त्यांना ‘जाऊच नये’ असे वाटत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment