बॉम्बे, औरंगाबाद यांसारखी परकियांची असात्विक नावे पालटून मुंबई, संभाजीनगर यांसारखी भाषा, राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान जपणारी नावे नगरांना देण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट
इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

प्राचीन काळी नगरांची (शहरांची) नावे तेथील ग्रामदेवता, पराक्रमी राजे आदींच्या नावांवर आधारित होती. त्यामुळे नगरांची नावे सात्त्विक होती. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी भारतावर परकियांची आक्रमणे होऊ लागली. तेथील काही भूभागांवर इस्लामी राजवटीस आरंभ झाला. इस्लामी राजांनी तेथील गावे आणि नगरे यांची हिंदु नावे पालटून इस्लामी नावे रूढ केली. कालांतराने इंग्रज (ब्रिटिश) लोक व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले. त्यांनी भारतातील अनेक संस्थानांना लक्ष्य करून त्यांची राजसत्ता हिसकावून घेतली. काही वर्षांतच संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या कह्यात गेला. त्यांनी भारतियांवर त्यांची भाषा आणि (कु)संस्कृती लादली. तसेच नगरांतील प्रमुख रस्ते, उपनगरे, रेल्वे-स्थानके आदींना ब्रिटिश राजा, राणी आदींची नावे दिली.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली. इतक्या वर्षांमध्ये भारतीय राज्यकर्त्यांना गावे, नगरे, तसेच नगरांतील प्रमुख रस्ते, उपनगरे, रेल्वे-स्थानके आदींची इस्लामी वा इंग्रजी नावे पालटता आली नाहीत, हे भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर एखाद दुसर्‍या मार्गाचे नाव पालटण्यात आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैझाबादचे नाव अयोध्या करणार असे घोषित केल्यावर देशभर धर्मांध, तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले यांनी या नामांतरावरून टीका चालू केली. या पार्श्‍वभूमीवर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने वर्ष २०१६ मध्ये करण्यात आलेल्या एका चाचणीचे निरीक्षण येथे देत आहोत.

महाराष्ट्रातील औरंगाबाद हे नाव मोगल बादशहा औरंगजेबाच्या नावावर आधारित आहे. औरंगाबाद या नगराला हिंदु धर्माभिमानी संभाजीनगर या नावाने संबोधतात. इंग्रजांच्या काळात मुंबई या नगराचे नामकरण बॉम्बे करण्यात आले होते. वर्ष १९९५ पर्यंत बॉम्बे हे नाव प्रचलित होते. त्यानंतर त्या नगराला पुन्हा मुंबई या नावाने संबोधले जाऊ लागले. मुंबई हे नाव मुंबादेवी या मुंबईच्या स्थानदेवतेच्या नावावर आधारित आहे. नगरांच्या नावांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २३.२.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (ऑराचा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर (टेबलावर) चाचणीसाठी ठेवायच्या नगराच्या नावाच्या छायाप्रतीला आधार देण्यासाठी पांढरा ठोकळा ठेवून तेथील वातावरणाचे पिप तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले.

ही वातावरणाची मूळ नोंद होय. त्यानंतर बॉम्बे मुंबई, औरंगाबाद आणि संभाजीनगर या नावांच्या छायाप्रती एकेक करून पटलावर ठेवून त्यांची पिप छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर चारही नगरांच्या नावांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे समजले.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे, चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता, प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.Sanatan.org/mr/PIP या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. मूळ नोंद

मूळ नोंदीच्या प्रभावळीत (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीत) ४५ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ५५ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती.

पुढे दिलेल्या निरीक्षणांत चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना मूळ नोंदीच्या प्रभावळीशी केली आहे.

२ आ. बॉम्बे या नावामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण,
तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वाढणे

बॉम्बे या नावाच्या प्रभावळीत ५३ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ४७ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ मूळ नोंदीच्या तुलनेत या नावामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदन ८ टक्के घटली होती. या नावाच्या प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंग १५ टक्के होता, म्हणजे मूळ नोंदीतील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (३१ टक्क्यांच्या) तुलनेत तो निम्म्याने घटला होता. यातून बॉम्बे या नावामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वाढले, असे लक्षात येते.

२ इ. मुंबई या नावामुळे वातावरणात पुष्कळ प्रमाणात शुद्धतेची स्पंदने
प्रक्षेपित होणे, चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण वाढणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

मुंबई या नावाच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ८९ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने आणि ११ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ मूळ नोंदीच्या तुलनेत मुंबई या नावाच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने ३४ टक्के वाढली होती.

२. चैतन्याचा पिवळा रंग ४५ टक्के होता, म्हणजे मूळ नोंदीतील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (३१ टक्क्यांच्या) तुलनेत तो वाढला होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग २८ टक्के दिसत होता.

थोडक्यात, मूळ नोंदीच्या तुलनेत मुंबई या नावामुळे वातावरणातील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते.

२ ई. औरंगाबाद या नावामुळे वातावरणातील चैतन्याच्या
स्पंदनांचे प्रमाण घटणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे

औरंगाबाद या नावाच्या प्रभावळीत ५२ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ४८ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ मूळ नोंदीच्या तुलनेत या नावामुळे वातावरणातील एकूण सकारात्मक स्पंदने ७ टक्के घटली होती. या नावाच्या प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंग १९ टक्के होता, म्हणजे मूळ नोंदीतील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (३१ टक्क्यांच्या) तुलनेत तो पुष्कळ घटला होता. यातून औरंगाबाद या नावामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वाढले, असे लक्षात येते.

२ उ. संभाजीनगर या नावामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित
होणे, चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

संभाजीनगर या नावाच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ८५ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने आणि १५ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ संभाजीनगर या नावाच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने मूळ नोंदीच्या तुलनेत ३० टक्के वाढली होती.

२. चैतन्याचा पिवळा रंग ५८ टक्के होता, म्हणजे मूळ नोंदीतील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (३१ टक्क्यांच्या) तुलनेत तो पुष्कळ वाढला होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंगही (९ टक्के) दिसत होता.

थोडक्यात, मूळ नोंदीच्या तुलनेत संभाजीनगर या नावामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित झाली, तसेच वातावरणातील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ३ मध्ये दिले आहे.

 

३. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

 

 

 

 

३ अ. औरंगाबाद आणि बॉम्बे ही नावे असात्त्विक, तर संभाजीनगर
हे नाव सात्त्विक असणे अन् मुंबई हे नाव त्याहीपेक्षा अधिक सात्त्विक असणे, यामागील कारण

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे रूप (उदा. एखाद्या घटकाचे नाव) आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. या सिद्धांताला अनुसरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. औरंगजेब हा क्रूर आणि निर्दयी बादशहा होता. त्याच्यामध्ये तमोगुण अधिक प्रमाणात असल्याने त्याची वृत्ती तामसिक होती. तमोगुण अधिक असलेल्या व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे औरंगजेबाच्या नावावरून ठेवलेल्या औरंगाबाद या नगराच्या नावातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

२. धर्मवीर संभाजीराजे हे धर्माचरणी आणि प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांच्यामध्ये सत्त्वगुण असल्याने ते सात्त्विक होते. सत्त्वगुण अधिक असलेल्या व्यक्तीमध्ये सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. धर्मवीर संभाजीराजे यांनी पराक्रमाची पराकाष्ठा करून हिंदु धर्म आणि प्रजा यांचे क्रूरकर्मा औरंगजेबापासून रक्षण केले. शत्रूच्या कह्यात सापडल्यावर त्यांनी अनंत यातना भोगल्या; परंतु धर्मपरिवर्तन केले नाही. धर्मरक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले. यातून प्रेरणा घेऊन सहस्रो मावळे धर्मरक्षणासाठी औरंगजेबाविरुद्ध लढण्यास सिद्ध झालेे. संभाजीनगर हे नाव अशा सत्त्वगुणी, धर्मपरायण आणि पराक्रमी संभाजी महाराजांच्या नावावर आधारित असल्याने त्या नावातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

३. मुंबई नगराचे नाव तेथील स्थानदेवता मुंबादेवी या देवतेच्या नावावर आधारित आहे. ही देवता मुंबई या नगराची रक्षणकर्ती आहे. देवतांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असते. देवतेच्या नावामध्ये त्या देवतेची दैवी स्पंदने आकृष्ट होतात. देवतांची नगरावर सदैव कृपा असावी आणि सर्व संकटांपासून नगरवासियांचे रक्षण व्हावे, या हेतूने प्राचीन काळी देवतांच्या नावावर आधारित नावे नगरांना देण्याची पद्धत होती. यातून मुंबई या नावाला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे, हे लक्षात येते.

४. मुंबई या नावाला जसा अध्यात्मशास्त्रीय आधार आहे, तसा बॉम्बे या नावाला नाही. इंग्रज हे अतिशय चलाख आणि स्वार्थी होते. त्यांनी कपट करून भारतातील अनेक संस्थाने कह्यात घेतली होती. त्यांनी त्यांची असात्त्विक भाषा, आचार-आहार, (कु)संस्कृती भारतियांवर लादली. इंग्रजांनी मुंबई या नगराचे बॉम्बे असे इंग्रजी नामकरण केले. सात्त्विक भाषेमध्ये सकारात्मक स्पंदने, तर असात्त्विक भाषेमध्ये नकारात्मक स्पंदने अधिक असतात. संस्कृत आणि त्या खालोखाल मराठी या भाषा अतिशय सात्त्विक आहेत. याउलट इंग्रजी ही भाषा सात्त्विक नसल्याने बाम्बे या नावातून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

थोडक्यात सांगायचे, तर नगरांच्या औरंगाबाद, बॉम्बे यांसारख्या असात्त्विक नावांमुळे त्या नगरातील लोकांना नकारात्मक, म्हणजे त्रासदायक शक्तींचा त्रास होतो. त्यामुळे नगरांची ती नावे पालटून त्यांना देवता, सात्त्विक हिंदु राजे आदींच्या नावावर आधारित सात्त्विक नावे देणे श्रेयस्कर आहे. यातून भाषाभिमान, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान हेही जपले जातात. भावी हिंदु राष्ट्रातील प्रत्येक गाव, नगर, जिल्हा आदींची नावे सात्त्विक असतील !

– सौ. मधुरा धनंजय कर्वे , महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.१.२०१७)

ई-मेल[email protected]

बॉम्बे, औरंगाबाद यांसारख्या असात्त्विक नावांमुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटणे, तर मुंबई, संभाजीनगर या सात्त्विक नावांमुळे वातावरणात पवित्रतेची स्पंदने प्रक्षेपित होणे, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे, हे दर्शवणारी पिप छायाचित्रे
सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २, ३, ४ आणि ५ यांची तुलना मूळ प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना चाचणीसाठी ठेवलेल्या नगराच्या नावांची छायाप्रत, तसेच पटल यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ : पिप छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात