जळगावातील नागरिकांनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घ्यावा ! – महापौर सौ. सीमा भोळे, भाजप

उद्घाटन करतांना महापौर सौ. सीमा भोळे

जळगाव – येथील महानगरपालिकेजवळ सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या वितरण केंद्राचे उद्घाटन १ डिसेंबरला जळगावच्या महापौर सौ. सीमा भोळे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे यांनी श्रीफळ वाढवले. महापौर सौ. सीमा भोळे यांनी सांगितले, ‘‘मी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचा लाभ वर्ष १९९८ पासून घेत असून हे कार्य स्पृहणीय आहे. याचा लाभ जळगावातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे मी आवाहन करते.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment