कोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून भेट

डावीकडून श्री अर्चना पुरी माँ, स्वामी म्रिगानंद महाराज आणि श्री. शंभू गवारे

कोलकाता (बंगाल) : येथील जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू गवारे यांनी भेट घेऊन सनातन संस्था अन् समिती यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांना सनातनच्या गोवा येथील आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. या वेळी स्वामीजींनी समिती आणि संस्था यांच्या कार्याचे कौतुक केले, तसेच गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच्या स्तरावर हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहेत, असे सांगितले. श्री सत्यानंद महापीठाविषयी त्यांनी माहिती दिली आणि पुढे याचा वापर हिंदु धर्माचे एक व्यासपीठ व्हावे, अशी इच्छा असल्याचे सांगितले. या भेटीसाठी भारत साधक समाज संस्थेचे श्री. अनिर्बान नियोगी आणि श्री. मानस रॉय यांनी विशेष प्रयत्न केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात