बार्सिलोना, स्पेनमध्ये मिरवणुकीतील श्री गणेशमूर्ती चर्चमध्ये आणण्याचा चर्चच्या अधिकार्‍यांचा आग्रह आणि स्पॅनिश चर्चने श्री गणेशाचे प्रेमाने अन् संगीताच्या सुरांनी केलेले स्वागत !

स्पेन येथील बार्सिलोना या शहरात भारतीय लोकांनी गणेशचतुर्थी साजरी करण्याचे ठरवले. त्यांनी मिरवणुकीसाठी शहराच्या प्राधिकरणाची अनुमती घेतली. मिरवणुकीसाठी जो मार्ग ठरला होता, त्या मार्गात ख्रिश्‍चनांची काही प्रार्थनामंदिरे (चर्च) होती. भारतीय लोकांनी श्री गणेशाची मिरवणूक चर्चसमोरून नेण्याविषयी चर्चच्या अधिकार्‍यांचीही अनुमती घेतली. आश्‍चर्य म्हणजे या अधिकारी व्यक्तींनी ‘श्री गणेशाची मूर्ती चर्चमध्ये आणावी आणि चर्चमध्ये जमलेल्या लोकांचा नमस्कार (अभिवादन) स्वीकारावा’, यासाठी आग्रह धरला. स्पॅनिश चर्चने श्री गणेशाचे प्रेमाने आणि संगीताच्या सुरांनी केलेले स्वागत पहाण्यासाठी खालील चलच्चित्र (व्हिडिओ) पहा !

 

Leave a Comment