श्री वल्लभाचार्य यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार श्रीनाथजींचा केला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण शृंगार !

५०० वर्षांपूर्वी श्री वल्लभाचार्य यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार नाथद्वारा, राजस्थान येथील मंदिरात श्रीनाथजींचा प्रत्येक तिथीनुसार केला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण शृंगार !

१. चैत्र कृष्ण पक्ष प्रतिपदा, २. भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी आणि ३. फाल्गुन पौर्णिमा या दिवशी श्रीनाथजींचा केलेला वैविध्यपूर्ण श्रृंगार ! श्रीकृष्णाची ही नयनमनोहर रूपे आपल्या हृदयात प्रस्थापित करण्यासाठी भावपूर्ण साधना करूया !

नाथद्वारा (राजस्थान) येथील मंदिरात श्रीनाथजी (श्रीकृष्णाचे गोवर्धन पर्वत उचलणारे रूप) यांचे वस्त्र आणि अलंकार तिथीनुसार निरनिराळे असतात. प्रत्येक तिथीनुसार त्यांचा वस्त्रोपचार आणि अलंकाराचा शृंगार कशा प्रकारे असावा ?, हे ठरलेले आहे. वर्षभरातील ३६५ दिवसांसाठी तो वेगवेगळा असतो.

१. श्रीनाथजींच्या मोरपिसापासून ते चरणांपर्यंतचे अलंकार प्रतिदिन निराळे असतात.

२. त्यांच्या पूजनामध्ये केल्या जाणार्‍या संगीत उपचारामध्ये गाण्यात येणारी भजनेही तिथीनुसार निरनिराळ्या रागांतील असतात.

३. शृंगार करतांना ऋतुमानानुसार अलंकार घातले जातात, उदा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोत्याचे दागिने, फाल्गुन मासात सोन्याचे, तर अन्य मासांंमध्ये रत्नजडित दागिने घातले जातात.

अनुमाने ५०० वर्षांपूर्वी श्री वल्लभाचार्य यांनी घालून दिलेल्या या नियमांनुसार अद्यापही हे सर्व चालू आहे.

(संदर्भ : www.nathdwaratemple.org)

Leave a Comment