समाजकल्याण

अ. शैक्षणिक उपक्रम

१. प्रश्नमंजुषा

भावी पिढी संस्कारक्षम आणि राष्ट्राभिमानी होण्यासाठी या उपक्रमाद्वारे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करून त्यांना विविध सण, उत्सवांच्या निमित्ताने भारताचा गौरवशाली इतिहास, नैतिक मूल्यांचे संवर्धन कसे करावे, भारताच्या भावी पिढीवर योग्य ते संस्कार करणे, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन अशा विविध विषयांवर प्रबोधन करण्यात येते. प्राविण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे दिली जातात. मागील (२०१० च्या) शैक्षणिक वर्षात १३१३ शाळांमधून आयोजित केलेल्या अशाउपक्रमांचा१,१३,०७३ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

२. व्यावसायिक प्रशिक्षण

सनातनच्या आश्रमांत गरजू तरूणांना सुतारकाम, वाहनदुरुस्ती, संगणक प्रशिक्षण, ध्वनीचित्रीकरण यांसारख्या व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते.

३. निवासी शिबिरे

दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण, व्यक्तीमत्त्व विकास यांसारख्या निवासी शिबिरांचे आयोजन केले जाते.

४. उपक्रमासाठी संस्थेच्या ग्रंथांची खरेदी

भारत सरकारच्या `सर्व शिक्षा अभियान’ या उपक्रमासाठी संस्थेचे ग्रंथ संमत आणि खरेदी झाले आहेत.

५. इतर

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य आणि गणवेश यांचे वाटप केले जाते.

आ. सामाजिक उपक्रम

१. तणावमुक्ती आणि व्यसनमुक्ती या विषयांवर प्रवचने

२. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम यांना आवश्यक वस्तूंचे वाटप

३. आपत्कालीन प्रशिक्षण शिबिरे

४. वृक्षारोपण

५. अग्नीशमन प्रशिक्षण शिबिरे

६. अन्नदान

७. आदीवासींना कपडे वाटप

८. चष्मेवाटप

इ. वैद्यकीय उपक्रम

१. आपत्कालात जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गांचे आयोजन

२. रक्ततपासणी

३. मोतीबिंदू चिकीत्सा

४. दंतचिकीत्सा

५. नेत्रचिकीत्सा

६. लसीकरण

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी निर्भीड प्रबोधनाबरोबरच समाजामध्ये त्या अनुषंगाने कृतीही घडून यावयास हवी; म्हणूनच समाजसाहाय्य आणि तदनुषंगाने समाजविकास यांसाठी सनातन कटिबद्ध आहे.

ई. सनातन अन्याय निवारण समिती

समाजाचा सर्वंकष उत्कर्ष व्हावा आणि त्यायोगे व्यापक राष्ट्रहित साधले जावे यासाठी सनातनने `सनातन अन्याय निवारण समिति’ स्थापन केली आहे. कायद्याने दिलेल्या अधिकारांची समाजातील प्रत्येक घटकाला जाण करून देणे आणि त्यायोगे व्यक्तिगत जीवनात होणार्‍या अन्यायाच्या विरोधात झगडण्याची क्षमता प्रत्येक समाजघटकात निर्माण करणे, यासाठी ही समिति कार्यरत आहे. या समितीतर्फे विविध प्रकारच्या अन्यायांविरुद्ध वाचा फोडण्यात येते.

उ. शिक्षण क्षेत्रातील अन्यायाचे निवारण

शिक्षण क्षेत्रातील दुर्जन म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून निरनिराळया मार्गांनी देणग्या स्वीकारणारे आणि कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन न देता त्यांच्याकडून सह्या घेणारे शिक्षणसम्राट आणि नवीनच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या नावाखाली छळणारे अन् त्यातून विकृत आनंद लुटणारे विद्यार्थी. असे शिक्षणसम्राट आणि विद्यार्थी यांना धडा शिकविण्यासाठी अन् या क्षेत्रातील पावित्र्य कायम राखण्यासाठी सनातन चळवळ चालवते.

ऊ. न्यायालयीन लढे

सामाजिक दुष्प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सनातन न्यायालयीन लढेही देते, उदा. गोवा राज्यात भटक्या जनावरांचा समाजाला होणारा उपद्रव टाळण्यासाठी पब्लिक ग्रीव्हन्सेस फोरम आणि सनातन संस्था यांनी संयुक्तरीत्या गोव्याच्या नगरपालिका संचालकांना कायदेशीर नोटीस दिली आहे.

ए. अन्य समाजहितकारी संस्थांच्या समवेत संयुक्त कार्य

समाजहितासाठी कार्य करणार्‍या अन्य संघटना आणि संस्था यांच्यासह देखील सनातनचे कार्य सुरू आहे. भ्रष्टाचाराला आळा घालणे, विक्रेत्यांना उघड्यावर खाद्यपदार्थ विकण्यास प्रतिबंध करणे, वाढती कचरासमस्या आटोक्यात आणणे, अमली पदार्थावरोधी जनजागृतीकरणे इत्यादींसाठी लढणार्‍या विविध सामाजिक संस्थांसह सनातन कार्यरत आहे.