गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्माभिमान्यांचे अभिप्राय

 

आश्रमात हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव आला !

‘आश्रमदर्शनानंतर मन शांत झाले आणि पुष्कळ आनंद वाटू लागला. आश्रमात हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव मला आला. तसेच ‘आश्रमातच रहावे’, असे वाटले.-  श्री. गोपालकृष्ण, शिवमोग्गा, कर्नाटक.

 

प.पू. गुरुदेवांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र निश्‍चितपणे येणार असल्याचे जाणवले

अ. ‘आश्रमदर्शनाने वैकुंठाचा अनुभव आला.

आ. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात प.पू. गुरुदेव साधकांचे कसे रक्षण करत आहेत’, याची जाणीव झाली. ‘प.पू. गुरुदेवांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र वर्ष २०२३ पर्यंत निश्‍चितपणे येणार’, असे जाणवले.’ – श्री. शबरीश वेंकटराम, शिवमोग्गा, कर्नाटक.

 

साधना करणार्‍यांसाठी हा आश्रम म्हणजे ‘देवलोक’ आहे

‘समाजातील सामान्य लोकांसाठी हा एक ‘चांगला आश्रम’ आहे, साधना करणार्‍यांसाठी हा आश्रम म्हणजे ‘देवलोक’ आहे आणि अधिकाधिक साधना (समष्टी साधना) करणार्‍यांसाठी हा आश्रम म्हणजे ‘एक राष्ट्र’ आहे !’ –  श्री. आर्. विश्‍वनाथ, शिवमोग्गा, कर्नाटक

 

आश्रमात मन निर्विचार होऊन प्रसन्न वाटले आणि गुरुकार्याप्रती कृतज्ञता वाटली !

आश्रमात मन निर्विचार होऊन प्रसन्न वाटले आणि गुरुकार्याप्रती कृतज्ञता वाटली !

‘आश्रमात आनंद आणि सात्त्विकता जाणवली. मनातील सर्व विचार जाऊन (मन निर्विचार होऊन) प्रसन्न वाटले. या गुरुकार्याप्रती आपण नतमस्तक होऊन कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच वाटते.’ – श्री. संगनगौड एच्. पाटील, विजयपूर, कर्नाटक

 

आश्रम पहातांना ‘हिंदु राष्ट्रातील एक एक भाग पहात आहे’, असे वाटले

आश्रम पहातांना ‘हिंदु राष्ट्रातील एक एक भाग पहात आहे’, असे वाटले, भावजागृती होत होती आणि ‘आपण दुसर्‍याच लोकात आलो आहोत’, असेही वाटले !

‘आश्रमात प्रवेश केल्यानंतर सतत भावजागृती होत होती. आश्रम पहातांना ‘हिंदु राष्ट्रातील प्रत्येक भाग पहात आहे’, असे वाटत होते. आश्रमाच्या कलशदर्शनाने पुष्कळ भावजागृती होत होती. आश्रमदर्शन करतांना ‘आपण दुसर्‍याच लोकात आलो आहोत’, अशी अनुभूती आली.

सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होत असल्याचे पाहून कृतज्ञता वाटली !

प्रदर्शन पाहून प.पू. गुरुदेवांच्या साधकांवर असलेल्या कृपेच्या वर्षावाची जाणीव झाली आणि ‘गुरुदेव वाईट शक्तींपासून साधकांचे रक्षण करत आहेत’, हे पाहून  कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. नीलकंठ बडची, विजयपूर, कर्नाटक.

 

 

‘आश्रमात ‘हिंदु राष्ट्र निर्मितीच्या यज्ञा’चे कार्य होत आहे !

‘हिंदु धर्माला राजधर्मरूपात मान्यता प्रदान करून देणारी ऊर्जा येथून प्रसारित होत आहे’, असे आम्हाला जाणवले.’

– श्री. राजन गुप्ता, सचिव आणि श्री. राजेश पटेल, सह-विधी प्रमुख, हिंदु शक्ती वाहिनी, अलवर, राजस्थान.

आश्रमात दिव्यतेची अनुभूती येते !

‘रामनाथी आश्रम अतिशय स्वच्छ, पवित्र (सात्त्विक) आणि आनंददायी आहे. येथील शिस्त, तसेच सुव्यवस्था उत्तमरित्या राखली गेली आहे. येथे दिव्यतेची अनुभूती येते.’

– स्वामी समानंदगिरीजी, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर, राजस्थान.

 परात्पर गुरुदेवांनी हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी निर्माण
केलेला आश्रम, म्हणजे हिंदु राष्ट्र आणण्याची खरी चळवळ आहे !

‘आश्रम पाहून पुष्कळ समाधान वाटले. आश्रमात पाय ठेवला आणि एक प्रकारची नीरव शांतता जाणवली. ‘परात्पर गुरुदेवांनी हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी निर्माण केलेला आश्रम, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र आणण्याची खरी चळवळ आहे’, असे वाटले.

 सूक्ष्म-जगत् प्रदर्शनातील परात्पर गुरुदेवांच्या वस्तू
पाहिल्यावर ‘साक्षात् ईश्‍वर दर्शन देत आहे’, असे वाटून भाव जागृत झाला !

‘साधकाला साधना करतांना काय त्रास होतो ?’, हे सूक्ष्म जगत् प्रदर्शनात पाहिले आणि साधनेवरचा विश्‍वास दृढ झाला. परात्पर गुरुदेवांशी संबंधित वस्तूंवर झालेला सूक्ष्मातील परिणाम पाहिल्यावर ‘साक्षात् ईश्‍वर दर्शन देत आहे’, असे वाटून भाव जागृत झाला.’

– श्री. दिलीप सीताराम परब, आंबडोस, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. (१९.८.२०१८)

 

आश्रम दाखवणार्‍या साधकाला धर्माभिमानी दिलीप परब यांनी सांगितलेली सूत्रे

‘श्री. परबकाका मला म्हणाले, ‘‘तुम्ही येथे रहाता, हे तुमचे भाग्य आहे. हे प्रत्यक्ष तीर्थक्षेत्र आहे.’’ पू. सौरभ जोशी यांचे दर्शन घेतल्यावर त्यांना पू. सौरभदादांचे चरण तेजस्वी जाणवले.’ – श्री. राज कर्वे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

उत्कृष्ट व्यवस्थापन आणि यंत्रही मोजू शकणार नाही, इतकी
सकारात्मक ऊर्जा असलेला सनातनचा रामनाथी, गोवा येथील आश्रम !

‘मी ‘आयआयटी’ आणि ‘एम्बीए’च्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतो. मी त्यांना पुष्कळदा सांगतो, ‘माझ्या बरोबर सनातनमध्ये चला. व्यवस्थापन पहायचं असेल, ऊर्जा अनुभवायची असेल, तर सनातनच्या आश्रमात चला. तेथे सर्वकाही मिळेल. तेथे कोणाच्याच तोंडवळ्यावर ताण नसतो. ‘कोणाबद्दल अविश्‍वास आहे’, असे वाटतच नाही. तेथील सकारात्मक ऊर्जा मोजायची झाली, तर ऊर्जा मोजण्याचे यंत्रही नापास होईल. इतकी सकारात्मक ऊर्जा आहे. (यंत्र मोजू शकणार नाही, इतकी सकारात्मक ऊर्जा आश्रमात आहे.)’

श्री. राजेंद्र अलख, संस्थापक, ब्रह्मांडीय आध्यात्मिक उपचारी संघ, मुंबई, महाराष्ट्र.

 

आश्रम हा ऊर्जास्रोत आहे !

‘समाजातील वातावरणापेक्षा आश्रमातील वातावरण वेगळे वाटते. आश्रम म्हणजे देवभूमी वाटते. संत, साधक, साधिका आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची साधना अन् संकल्प यांमुळे हे हिंदु राष्ट्राचे लहान स्वरूप वाटते. हा आश्रम ऊर्जास्रोत आहे. येथे मला नवीन ऊर्जा मिळाली. परत एकदा देवाने सर्व चुका पोटात घेऊन नव्याने साधना करण्यासाठी संधी दिली आणि पुढील मार्ग दाखवला.’

– श्री. सागर शुक्ल, कार्यकर्ता, हिंदु महामंडलम्, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र. (८.६.२०१८)

 

हा आश्रम पाहिल्यावर आता कुठेच जायला नको’, असे वाटते !

 

‘मी गोव्यातील सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यावर माझ्या मनात कोणतीही इच्छा किंवा अभिलाषा राहिली नाही. मी फार फार समाधानी आणि आनंदी आहे. मला श्रीकृष्ण-सुदाम्याची कथा आठवते. सुदामा श्रीकृष्णाकडे ‘काहीतरी साहाय्य मिळेल’, या आशेने गेला होता. तो परत जातांना श्रीकृष्णाने त्याला काही दिले नाही; परंतु तो नाराज झाला नाही. तो फार आनंदी होता. मीही सुदाम्याप्रमाणे पूर्ण समाधानी आहे. सुदाम्याप्रमाणेच मला सर्व काही मिळाल्याचा आनंद वाटत आहे. आतापर्यंत अनेक तीर्थयात्रा केल्या; परंतु ‘हा आश्रम पाहिल्यावर आता कुठेच जायला नको’, असे वाटते. आता मला समाधान वाटत असून ‘हे भावपुष्प जपून ठेवूया’, असे वाटते.’

– सौ. सुमन गावडे, मुख्याध्यापिका, सरस्वती विद्यालय, बारामती. (फेब्रुवारी २०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात