परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आयुर्वेद या प्राचीन हिंदु आरोग्यशास्त्राचा सार आणि त्यायोगे हिंदु संस्कृतीचे संवर्धन करणे

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी आयुर्वेदाची उपेक्षा केल्याने एक परिपूर्ण शास्त्र असूनही आज भारतात आयुर्वेदाला पर्यायी उपचारपद्धतीचे स्थान आहे. भावी हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) आयुर्वेद ही पर्यायी नव्हे, तर मुख्य उपचारपद्धत असेल. आयुर्वेदाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले कार्यरत आहेत. त्यांच्या प्रेरणेने सनातनने आयुर्वेदावरील ग्रंथमालिका काशित केली आहे. सनातन प्रभात नियतकालिकांतून आणि sanatan.org या संकेतस्थळावरून आयुर्वेदाविषयी जनजागृती करणारे लेख नियमितपणे प्रकाशित केले जातात.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आयुर्वेदासंबंधी शिबिरे आयोजित केली जातात. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्थापन केलेल्यामहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या भावी वास्तूत आयुर्वेदाविषयी संशोधन करणारा विभाग, तसेच वनौषधींची लागवड आणि गोशाळा यांचाही समावेश असणार आहे.

आयुर्वेद हा हिंदु संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. परात्पर गुरु डॉक्टर आयुर्वेदाचा सार करून त्यायोगे चैतन्यमय हिंदु संस्कृतीच्या संवर्धनाचे मौलिक कार्यही करत आहेत.