भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य

१. भावी भीषण आपत्काळाचा विचार काही वर्षे आधीच करून आपत्काळात जीवितरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या विविध उपचारपद्धतीं-विषयीची माहिती संग्रहित करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले!

सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे काही संतांचे भाकीत आहे. शीव, मुंबई येथे रहात असल्यापासून परात्पर गुरु डॉक्टरांनी आयुर्वेद, योगासने, रेकी यांसारख्या विविध उपचारपद्धतींवरील पुष्कळ कात्रणे जमवून ठेवली होती. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथ-निर्मितीचा उद्देश समाजाला अध्यात्म आणि साधना शिकवणे, हा असतांना त्यांनी इतक्या आधीपासून उपचारपद्धतींसारख्या विषयांवरील कात्रणेही का जमवून ठेवली होती?, याचा उलगडा मला वर्ष २०१३ मध्ये झाला. भावी तिसर्‍या महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध होणार नसतांना प्रत्येकाला स्वतःच स्वतःवर उपचार करता येणे आवश्यक ठरते. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१३ मध्ये मला विविध उपचारपद्धतींविषयीची भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका आरंभ करण्यास सांगितले. अनेक वर्षे आधीच जमवून ठेवलेल्या कात्रणांचा आता या ग्रंथमालिकेसाठी उपयोग होत आहे. भावी काळात अखिल मानवजातीचे जीवितरक्षण व्हावे, यासाठीआवश्यक असलेल्या गोष्टींचा इतका आधीपासून विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर हे बहुधा पृथ्वीवरील एकमेव द्रष्टे असतील ! – पू. (श्री.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक(५.३.२०१७)

(मार्च २०१७ पर्यंत या ग्रंथमालिकेतील १९ ग्रंथ सिद्ध झाले आहेत आणि उर्वरित ग्रंथांची निर्मिती चालू आहे. हे ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत. या ग्रंथांच्या आधारे बनवलेले लेख सनातन प्रभात नियतकालिकांतून सिद्ध करण्यात येत असून ते sanatan.org आणि ssrf.org या संकेतस्थळांवरही ठेवले जातात.)

 

२. प्रथमोपचार शिक्षण, आपत्कालीन साहाय्य
शिक्षण आणि अग्नीशमन शिक्षण यांविषयी जनजागृती

अपघातात जखमी होणे, गॅस सिलेंडरची गळती, शॉर्ट सर्कीट आदी संग दैनंदिन जीवनात केव्हाही घडू शकतात. आगामी भीषण काळात अशा संगांत त्वरित साहाय्य मिळणेही कठीण होईल. अशा संगांत त्वरित उपाययोजना केली नाही, तर जीवित आणि वित्त यांची हानी होते. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली थमोपचार शिक्षण, आपत्कालीन साहाय्य शिक्षण आणि अग्नीशमन शिक्षण यांविषयी जनजागृती चालू आहे. या अंतर्गत ग्रंथांची निर्मिती, शिक्षणवर्गांचे आयोजन इत्यादी कार्य चालू आहे.

 

३. भावी भीषण आपत्काळात जीवितरक्षण
होण्यासाठी आतापासूनच साधना करण्याला पर्याय
नाही, हे समाजमनावर बिंबवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आपण बिंदूदाबन, थमोपचार, नामजप-उपाय आदी उपचारपद्धती कितीही शिकून घेतल्या, तरी त्सुनामी, भूकंप अशा काही क्षणांत सहस्रो नागरिकांचा बळी घेणार्‍या महाभयंकर आपत्तींमध्ये जिवंत राहिलो, तरच या उपचारपद्धतींचा उपयोग करू शकतो ! अशा आपत्तींत आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच! भगवंताने आपल्याला वाचवावे, असे वाटत असेल, तर आपण साधना आणि भक्ती करायला हवी. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर गेली अनेक वर्षेभावी भीषण आपत्काळात जीवितरक्षण होण्यासाठी आतापासूनच साधना करायला हवी, हे समाजमनावर बिंबवत आहेत.

Leave a Comment