परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले स्वभाषारक्षणाचे कार्य आणि भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन

स्वभाषाभिमानाविना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभाषाभिमान आणि स्वभाषारक्षण यांचे महत्त्व सांगणारी ग्रंथमालिका संकलित केली. त्यांनी स्वभाषारक्षण या ग्रंथमालिकेतून परकीय भाषांच्या तुलनेत मराठी, हिंदी आणि देवभाषा संस्कृत यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व सांगितले.

 

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेली भाषाशुद्धीची चळवळ

मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये घुसलेल्या इंग्रजी, उर्दू, फारसी या परकीय भाषांतील शब्दांचा वापर न करता स्वभाषेतील संस्कृतनिष्ठ तिशब्द वापरावेत, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर खंडित झालेली भाषाशुद्धीची चळवळ पुनश्‍च चालू केली. त्यांनी स्वभाषांच्या शुद्धीकरणाची चळवळ चालू करण्यासह नगरे(शहरे), वास्तू आदींनाही परकीय आक्रमकांची नावे असू नयेत, यासाठी जनजागृती आरंभली. स्वाक्षरी स्वभाषेत करावी, दुकानांच्या पाट्या स्वभाषेत असाव्यात आदींसंदर्भातही बोधन चालू आहे.

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतोद्भव भारतीय भाषांचा आणि इंग्रजीचा व्यक्ती, पक्षी, पाणी आदींवर होणारा परिणाम, संस्कृत भाषेमुळे होणारे आध्यात्मिक उपाय आदी भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन चालू आहे.

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी अक्षरांच्या तुलनेत देवनागरी(संस्कृत, हिंदी आणि मराठी) अक्षरे सात्त्विक असल्याचे दर्शवणारी वैज्ञानिक चाचणीपिप(पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आली आहे.