जीवनावर आणि साधनेवरही विपरित परिणाम घडवणार्‍या भीतीचा संस्कार पुसून टाकण्यासाठी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केलेले प्रयत्न आणि श्रीकृष्णाने त्यांना केलेले साहाय्य

        माझ्यामधे भीती वाटणे आणि त्यासमवेतच न्यूनगंड आणि राग येणे, हे अहंचे पैलू प्रबळ आहेत. मी राबवत असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया, तसेच जानेवारी २०१५ मधे स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) च्या वतीने झालेल्या कार्यशाळेत पू. लोलाआजी, पू. सिरियाकदादा, कु. अ‍ॅना ल्यु आणि श्री. मिलुटीनदादा यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यांमुळे मी भीती वाटणे, या दोषाच्या मुळाशी जाऊन त्याची व्याप्ती काढू शकले. गेल्या वर्षभरात मी हा दोष घालवण्यासाठी प्रयत्न करत असून श्रीकृष्णाच्या साहाय्यामुळे आणखी योग्य दिशेने त्यावर मात करू शकत आहे.

 

shweta_clerk_aug2015_clr
सौ. श्‍वेता क्लार्क

 

१. भीती वाटणे, या दोषाच्या पैलूंच्या प्रकटीकरणामुळे जीवनातील
घटनांवर पुष्कळ परिणाम होऊन साधनेत मागे पडल्यासारखे वाटणे

भीती वाटणे, या दोषाच्या पैलूंच्या प्रकटीकरणामुळे माझ्यावर पुष्कळ परिणाम होत असल्याने मी अधिकाधिक दुर्बळ होत असे आणि असे माझ्या जीवनातील प्रत्येक घटनेच्या वेळी दिसून येत होते. माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही, साधनेत मी मागे पडेन किंवा मी कितीही प्रयत्न केले, तरी ते चांगले होणारच नाहीत, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात यायचे आणि असे विचार मनात येणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे, असे पूर्वी मला वाटायचे. या सर्व विचारांचा माझ्या आयुष्यातील बर्‍याच घटनांवर परिणाम होत असे आणि आता साधनेतही या विचारांमुळे मी मागे खेचले जात होतेे.

 

२. यजमानांच्या संदर्भात दुसर्‍यांदा झालेल्या चुकीबद्दल त्यांची क्षमा मागणे
आणि नंतर मनात स्वतःविषयीच्या अनावश्यक विचारांचे काहूर माजून रडू येणे

डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या काळात होणारी एस्.एस्.आर्.एफ्.ची कार्यशाळा जवळ येत असल्यामुळे मला उत्साह वाटत होता. कार्यशाळेला येणार्‍या सहसाधकांनी स्वभावदोष निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न जाणून घेणे आणि माझ्या मनात खोलवर रूतलेल्या भीतीच्या संस्कारावर मात करण्यासाठी त्यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन, यांची मी उत्सुकतेने वाट पहात होते. कार्यशाळेला आरंभ होण्याच्या २ दिवस आधी एक प्रसंग घडला. माझे पती श्री. शॉन यांच्यासंदर्भात माझ्याकडून एक चूक झाली आणि त्यांनीच ती माझ्या लक्षात आणून दिली. यापूर्वीही माझ्याकडून अशी चूक झाली होती. पुन्हा तीच चूक केल्यामुळे ते माझ्यावर रागावले होते. मी त्वरित त्यांची क्षमा मागितली; परंतु थोड्या वेळाने अंतरात काहूर माजल्याचे माझ्या लक्षात आले. मला रडू आले आणि मी कितीही प्रयत्न केले, तरी अपयशच येणार. मी कुणासाठीही महत्त्वाची नाही. एका ठराविक मर्यादेपर्यंत सर्वजण माझ्यावर प्रेम करतील; परंतु मी महत्त्वाची व्यक्ती आहे, असे कुणालाही वाटणार नाही, यांसारख्या विचारांनी मला ग्रासले.

 

३. मनात येणार्‍या विचारांची भीती वाटून आपल्यावर कुणी प्रेम
करत नाही, हेच सत्य असल्याचे वाटणे आणि भीतीशी संबंधित चूक घडल्यावर
कुटुंबियांनी दुय्यम प्राधान्य देऊन केेेलेल्या अवहेलनेचे बालपणीचे प्रसंग आठवून रडू येणे

यापूर्वीही जेव्हा अशा प्रकारचे विचार मनात यायचे, तेव्हा मला पुष्कळ भीती वाटत असल्याने मनात येणारे हे विचार पूर्णपणे सत्य आहेत, असे मला वाटायचे. त्यामुळे सर्वकाही अस्पष्ट होऊन माझ्या विचारांमध्ये सुस्पष्टता नसायची. भीतीशी संबंधित एखादी चूक किंवा प्रसंग घडल्यास मला माझ्या बालपणातील प्रसंग आठवायचे. अर्थातच याचा परिणाम माझी सेवा आणि साधना यांवर होत असे.

 

४. भीतीमुळे दुःखी होऊन नकारात्मक स्थितीत जात
असतांनाच हे अहंमुळे घडत असून सर्वजण आपल्यावर प्रेम करत
आहेत, याची श्रीकृष्णाच्या कृपेमुळे जाणीव होणे आणि भीतीच्या पिंजर्‍यातून
मुक्त करून मला तुझ्या चरणांशी घे, अशी श्रीकृष्णाला तळमळीने प्रार्थना होणे

या वेळी मात्र श्रीकृष्णाने हे सर्व पालटले. श्री. शॉन यांनी माझी चूक लक्षात आणून दिल्यावर आणि ते माझ्यावर रागावल्यावर मला अंतरात एकटेपण जाणवू लागले. मी नकारात्मक स्थितीत जात असतांनाच माझ्याकडून श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना होऊ लागली. मी असाहाय्यपणे त्याला विनवू लागले, हे श्रीकृष्णा, माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, हा आणि अशा प्रकारचे विचार पूर्णपणे असत्य आहेत. माझा अहं मला चूक करायला भाग पाडत आहे. हे दयाघना, ही विचारांची शृंखला तुटू दे. श्रीकृष्णा, सर्व साधक माझ्यावर प्रेम करतात, हे माझ्या लक्षात येऊ दे. श्री. शॉन हे माझे सहसाधक असून ते तर माझी पुष्कळ काळजी घेतात. त्यांनी आजपर्यंत मला साधनेत केलेल्या साहाय्याबद्दल मी त्यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञ आहे. आश्रमातील सर्व साधक माझ्यावर प्रेम करतात. हे कृपावंता, मला या भीतीच्या पिंजर्‍यातून मुक्त कर. दुःखी होण्याचा आता मला कंटाळा आला आहे. मला साधिका बनून लवकरात लवकर तुझ्या चरणी विसावा घ्यायचा आहे; परंतु या भीतीमुळे मी मागे खेचले जात आहे. मी असाहाय्य असल्याने तूच मला साहाय्य कर. सर्वकाही स्वीकारून यातून बाहेर पडण्यासाठी तूच मला बळ दे !

 

५. श्रीकृष्णाने भीतीचे प्रकटीकरण कशा प्रकारे होते, हे
नेमकेपणाने दाखवून दिल्याने पुष्कळ बरे वाटून ओझे उतरल्याप्रमाणे वाटणे

त्या वेळी भीतीचे प्रकटीकरण कशा प्रकारे होते ?, हे श्रीकृष्णाने मला स्पष्टपणे आणि नेमकेपणाने दाखवून दिले. श्रीकृष्ण म्हणाला, सर्वजण माझ्यावर प्रेम करतात; परंतु ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच सीमित असते. प्रत्येकाच्या जीवनात माझे स्थान नेहमीच दुय्यम आहे. इतरांनी मला प्राधान्य द्यावे, यासाठी आवश्यक असे गुण माझ्यात नाहीत. देवाने मला जवळ करावे, एवढा भावही माझ्यात नाही. इतर अनेक साधकांमधे अधिक भाव आणि समष्टी गुण असल्याने ते देवाला अधिक प्रमाणात आवडतील. सर्वजण माझ्याकडे दुर्लक्ष करतात, हे माझे सर्व विचार पूर्णपणे चुकीचे आहेत, असे मला सांगितले.

        याची जाणीव होताक्षणी मला ५० टक्के बरे वाटले. माझ्या डोक्यावरचे मोठे ओझे उतरल्याप्रमाणे वाटले. मी श्रीकृष्णाचे चरण कवटाळूनच बसले होते. श्रीकृष्णाने मला हे सांगितले, तेव्हाही मला रडू येत होते.

 

६. आतापर्यंत केलेल्या अधिकांश चुका, प्रसंगातून काढलेले
निष्कर्ष आणि साधकांविषयी बनवलेले मत हे मागील जन्मांच्या संस्कारांमुळे
मनाने निर्माण केलेल्या आभासमय भीतीचे प्रकटीकरण असणे आणि मन घटनेशी
असंबद्ध विचार जोडून भीतीचा तो संस्कार वाढवत असल्याचे श्रीकृष्णाने स्पष्ट करणे

श्रीकृष्ण पुढे म्हणाला, अहंभावामुळे तू रडत आहेस, ते थांबव; नाहीतर नवीन कर्म निर्माण होतील. धैर्य आणि मनोबल वाढवणे यांसाठी मला प्रार्थना कर. आतापर्यंत तू केलेल्या अधिकांश चुका, घडलेले प्रसंग आणि त्यातून काढलेले निष्कर्ष, तसेच साधकांविषयी बनवलेले मत हे सर्व या भीतीच्या प्रकटीकरणावर आधारित आहे. मागील जन्मांच्या संस्कारांमुळे मनाने निर्माण केलेला हा एक प्रकारचा आभास आहे. तू यावर मात केलीस, तर तुझ्या ८० टक्के समस्या दूर होतील. हे सर्व कसे खोटे आहे, तेही श्रीकृष्णाने दाखवून दिले.

 

७. श्रीकृष्णाच्या या विश्‍लेषणानंतर
अहंभावामुळे स्वतःच्या विचारात सुस्पष्टता नसल्याचे लक्षात येणे

श्री. शॉन यांनी लक्षात आणून दिलेली चूक खरी आहे. ती स्वीकारून तिला कारणीभूत असणार्‍या दोषांवर मात करण्याचे प्रयत्न करायला हवेत. कुणालाही मी महत्त्वाची वाटत नाही, यांसारखे तुझ्या मनात येणारे विचार अप्रस्तुत असून त्यांचा या घटनेशी काहीएक संबंध नाही. अशा प्रकारे तुझे मन घटनेशी असंबद्ध विचार जोडून भीतीचा संस्कार वाढवते.

        श्रीकृष्णाने हे सांगितल्यावर अहंभावामुळे सर्व गोष्टींचा गुंता वाढत जाऊन कशातच सुस्पष्टता नसते. याउलट देव कार्य करतो, तेव्हा सर्वकाही स्पष्ट आणि सोपे होत जाते, हे माझ्या लक्षात आले.

 

८. मनावर विश्‍वास ठेवणे बंद केल्यावर श्रीकृष्णाने
चैतन्याने लढून मागील जन्मापासून असलेला मनावरील भीतीचा
संस्कार न्यून करणे आणि मनावरील भीतीचा पगडा हळूहळू सुटत जाणे

आयुष्यात प्रथमच मी मनाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवणे बंद केले. मनावरचा संस्कार पुसून टाकण्यासाठी श्रीकृष्ण माझे मन आणि बुद्धी चैतन्याने भरत आहे, असे मला वाटत होते. काही वेळातच मी माझे रडणे थांबवू शकले. माझ्या मनावर असलेला भीतीचा पगडा हळूहळू सुटत असून मला उत्तम साधिका बनायचे आहे, हा विचार दृढ होत असल्याचे मला जाणवले.

        भीतीमुळे माझा एकलकोंडेपणा वाढतो आणि त्यामुळे सर्व लक्ष स्ववरच केंद्रित होते. श्रीकृष्ण या संस्काराशी लढून आपल्या चैतन्याने हा संस्कार न्यून करत होता. यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. कार्यशाळेतील इतर साधकांचे साहाय्य घेऊन हा संस्कार आणखी न्यून करण्याचे मी ठरवले.

 

९. भीतीच्या विचाराने ग्रासलेल्या कु. अ‍ॅना ल्यु या
साधिकेने भीतीच्या मुळापर्यंत जाऊन तिच्यावर मात केल्याचे
कार्यशाळेत कळल्यावर त्यांच्याप्रमाणे प्रयत्न करून दोषावर मात करण्याचे ठरवणे

२९.१२.२०१५ या शिबिराच्या पहिल्याच दिवशी कु. अ‍ॅना ल्यु यांनी सांगितले, काही वर्षांपूर्वी माझा वापर करून घेणार आणि कालांतराने मी मरून जाणार या भीतीच्या विचाराने मला ग्रासले होते; मात्र मी अंतर्मुख होऊन जीवनातील प्रत्येक प्रसंगावर परिणाम करण्यार्‍या या भीतीच्या मुळाचा शोध घेतला आणि भीतीला आळा घातला. त्या वेळी श्रीकृष्ण एकाच वेळी सर्व साधकांना साधनेतील अडथळा नेमकेपणाने दाखवून तो काढून टाकत आहे, असे वाटून त्याच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. कु. अ‍ॅना यांच्या उदाहरणातून मला बरेच काही शिकता आले. भीतीच्या प्रसंगांच्या वेळी मीसुद्धा त्यांच्याप्रमाणे प्रयत्न करून त्यावर मात करीन, असे मी ठरवले.

        हे श्रीकृष्णा, आम्हाला साधनेत साहाय्य करणार्‍या कु. अ‍ॅना ल्यु, संत आणि सर्व साधक यांच्या रूपातील ही समष्टी दिल्याबद्दल मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहेे. आमचा अहं, मनावरील संस्कार यांवर मात करून तुझ्या निकट येण्यासाठी तुझ्याकडून आम्हाला सतत साहाय्य मिळू दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

– सौ. श्‍वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०१५)