मंदिरातील फरशीवर झोपून राहिल्याने महिलांना होते अपत्यप्राप्ती ! – देवीभक्तांची श्रद्धा

विज्ञानासाठी आव्हान ठरलेले हिमाचल प्रदेशातील जागृत सिमसा माता मंदिर

simsa-mata-mandir-3

simsa-mata-mandir-1

मंडी (हिमाचल प्रदेश) – देशात सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. देवींची मंदिरे भाविकांनी फुलून गेली आहेत. असेच एक मंडी जिल्ह्यातील सिमस गावात सिमसा माता देवीचे मंदिर आहे. ही देवी अपत्यहीन महिलांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून संतान दात्री या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी नवरात्रोत्सवात संतान प्राप्तीसाठी पंजाब, हरियाणा, चंदीगड, तसेच देशातील अनेक भागांतून जोडपी येत असतात. या मंदिरातील फरशीवर महिला झोपून रहातात आणि त्यांना अपत्यप्राप्ती होते, असे सांगितले जाते. या मंदिराचे कोडे अद्याप विज्ञानालाही उलगडता आलेले नाही.

simsa-mata-mandir-2

नवरात्रीमध्ये येथे सलिंदरा उत्सव साजरा केला जातो. सलिंदराचा अर्थ स्वप्न पडणे असा आहे. असे सांगितले जाते की, अपत्यप्राप्तीसाठी महिला तशी मनोकामना करून रात्रंदिवस मंदिरातील फरशीवर झोपून रहातात. त्यानंतर त्यांना प्रतिकात्मक रूपात देवीचे दर्शन घडते आणि अपत्यासाठी आशीर्वाद मिळतो. असे सांगतात की, पेरू अथवा तसेच एखादे फळ स्वप्नात दिसले, तर मुलगा होतो, भेंडी दिसली तर मुलगी होते आणि धातू, लाकूड, दगडाच्या वस्तू दिसल्या, तर त्या महिलांना अपत्य होणार नाही, असे समजण्यात येते. तरीही या महिला मंदिरात राहिल्या, तर अंगावर लाल चट्टे येऊन त्यांच्या अंगाची आग होते, असेही सांगण्यात येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात