प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याशी निगडित अमूल्य ठेवा असलेले कोल्हापूर येथील स्वामी स्वरूपानंद मठ (श्री.जामसंडेकर निवास)

rs37753_swami_svarupanandरत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचे आध्यात्मिक कार्य अलौकिक आहे. या आध्यात्मिक ठेव्याचा लाभ अनेक भाविकांना आजही होत आहे. कोल्हापूर येथील श्री. जामसंडेकर निवास येथे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे. त्याच्याशी निगडित छायाचित्र येथे देत आहोत.

 

 

pawas_samadhi
प.पू. स्वामींच्या पावस येथे असलेल्या समाधीच्या शिळेचा तुकडा
ppswami_devghar
श्री. जामसंडेकर यांच्या निवासस्थानातील प.पू. स्वामींचे देवघर
ppswami_nyaneshwari
प.पू. स्वामी स्वरूपानंद लिखित ज्ञानेश्‍वरी (मूळ हस्ताक्षर)

उत्सवांत राष्ट्र आणि धर्म या विषयांवर कार्यक्रम चालू करण्याविषयी प.पू. स्वामींच्या जीवनातील एक प्रसंग !

कोकणात मोठ्या प्रमाणात होणार्‍या उत्सवांत त्या काळी नाट्य, गाणी, नाच, तमाशा यांसारखे कार्यक्रम होत असत. याविषयी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रबोधन करून प. पू. स्वामींनी उत्सवांतून श्रीकृष्णमेळा करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी तरुणांना एकत्र करून श्रीकृष्णलीला नाट्य प्रबोधन स्वरूपात करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्वत: गाणी आणि संवाद लिहिले.

बालका कोपू नका ।
ग्रामवासी सज्जनांनो बोल माझे आयका ।
ग्राम्य गीते लावण्या ही योग्य का देवापुढे ?
बंद व्हावे कामुकांचे नाच वेडेवाकडे ॥
याचसाठी लावल्या का भोवतीच्या दीपिका ।
जाणुनी घ्या कोण होते कृष्ण गोपी राधिका ॥

या प्रयत्नांमुळे उत्सवांतील अपप्रकार थांबून समाजामध्ये राष्ट्र्र आणि धर्म यांविषयीचे विचार रूजण्यास साहाय्य झाले.(हिंदूंनो, यंदाच्या गणेशोत्सवापासून प.पू. स्वामींची शिकवण आचरणात आणून उत्सवांत केवळ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करूया ! तीच प.पू. स्वामींच्या चरणी खरी कृतज्ञता ठरेल. – संकलक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात