नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये पूर, तर काश्मीर आणि आसामला पुराचा तडाखा !

BIHAR-FLOOD_9_9_2013

नवी देहली : नेपाळमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारच्या १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने आसामच्या २१ जिल्ह्यांतील १६ लाख लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत बिहारमध्ये १७, तर आसाममध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र नेपाळमध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला.

याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बंगाल येथील नद्यांनाही पूर येण्याची शक्यता आहे. जम्मूमध्ये २ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगर येथे लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. ठिकठिकाणी दरड कोसळल्याने अमरनाथ यात्रा मध्येच थांबवण्यात आली आहे, तर केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे जाणारे यात्रेकरू मध्येच अडकले आहेत. सीमेवरील भारतीय सैन्याच्या चौकी आणि बंकर पाण्याखाली गेले आहेत. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळसहित ५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे

१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बंगाल, बिहार आणि आसाममधील पूरस्थितीवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात