पुरामुळे बंगालमध्ये ४ जणांचा मृत्यू, तर आसाममध्ये ६ लाख लोकांना फटका !

assam_flood

गुवाहाटी / कोलकाता : बंगालमध्ये अलीपुरद्वार, जलपाईगुडी आणि कूच बिहार या ३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामध्ये ४ जण ठार झाले, तर ५८ सहस्र लोक बाधित झाले आहेत. हे मृत्यू भिंत पडल्याने, पाण्यात बुडाल्याने आणि पाण्यातील साप चावल्याने झाले आहेत.     

आसाममध्ये १४ जिल्ह्यांमधील ६ लाखांहून अधिक नागरिकांना या पूराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी एन्डीआर्एफ्, एस्डीआर्एफ् आणि भारतीय सैन्य यांना तैनात करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी ८१ ठिकाणी साहाय्य छावण्या उभारण्यात आल्या आहेत. पुरामुळे काझीरंगा अभयारण्यातील वन्यजीवन मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे    

१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (बंगाल आणि आसाममध्ये पुरस्थितीवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात