सुक्या मेव्यामुळे कर्करोगापासून होते रक्षण !

sukameva

नवी देहली/लंडन : बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अक्रोड खाणार्‍या व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका ३४ टक्क्यांनी न्यून होत असल्याचे दिसून आले. प्रतिदिन १.५ औंस अक्रोड खाणार्‍याच्या आरोग्यात सकारात्मक पालट झाल्याचे इंटरनॅशनल ट्री नट कौन्सिल न्यूट्रिशन रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक मौरेन तेरनस यांनी नमूद केले आहे.

मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका अल्प करण्यात अक्रोड महत्त्वाची भूमिका पार पाडते, तसेच अक्रोडमध्ये लाभदायी चरबी, उच्चदर्जाची प्रथिने आणि रसायने असतात. यामुळे व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण होत असल्याचे ब्रिटीश जर्नल ऑफ कॅन्सर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात नमूद करण्यात आले आहे.

तब्बल २६ वर्षे चाललेल्या या संशोधनामध्ये ४७ सहस्र २९९ लोकांचा अभ्यास करण्यात आला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात