पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

ashram१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

marathe_kaku
डावीकडून श्री. संजय भाई, व्हिडिओ संकलक, पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रम, साबरमती, कर्णावती; चि. खुशाल दुबे, संतश्री आसारामजी आश्रम, देहली; कु. रेखा आणि साध्वी तरुण बहेन, धर्मप्रचारक, पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रम, साबरमती, कर्णावती यांना सनातनच्या नियतकालिकांविषयी माहिती देतांना सौ. मंगला मराठे
rameshwar_mishra
डावीकडून कुसुमलता केडिया, संचालक, धर्मपाल शोध पीठ, भोपाळ, मध्यप्रदेश आणि श्री. रामेश्‍वर मिश्र, संचालक, हिंदू विद्या केंद्र, वाराणसी, उत्तरप्रदेश यांना ध्वनीचित्रफितींविषयी माहिती देतांना श्री. अमोल हंबर्डे
rajani_kurhe
डावीकडून श्री. विलास चौधरी, उपाध्यक्ष, जय श्रीराम ग्रुप, जळगाव, महाराष्ट्र्र; श्री. उमेश जोशी; श्री. पियूष महाजन, कार्यकर्ता, जय लेवा ग्रुप, जळगाव, महाराष्ट्र; श्री. भूषण महाजन, जळगाव, महाराष्ट्र आणि श्री. तात्यासाहेब नागरे, जळगाव, महाराष्ट्र्र यांना प्रसारसाहित्याविषयी माहिती सांगतांना कु. रजनी कुर्‍हे
rohit_salunkhe
डावीकडून के.सी. लालवानी, कोषाध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, जबलपूर आणि श्री. अतुल जेसवानी, संस्थापक अध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश यांना सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन दाखवतांना सनातनचे श्री. रोहित साळुंके

आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१. प्रत्येक हिंदूने अभिमान बाळगावा, अशी ही संस्था आहे !

‘स्वच्छ अन् सुंदर, पवित्र वातावरण, अतिशय शिस्तपूर्ण अन् नियोजनबद्ध कार्य. आश्रम पाहून आनंद झाला. प्रत्येक हिंदूने अभिमान बाळगावा, अशी ही संस्था आहे.’ – श्री. व्यंकटेश यशवंतराव शिंदे, बेळगाव, कर्नाटक. (२१.६.२०१६)

२. ‘आश्रमात राहून येथे मनोभावे सेवा करावी’, असे वाटले !

‘आश्रमातील कार्य हे प्रत्यक्ष ईश्‍वरी सेवा असून या कार्याविषयी आपण सर्व संतांचे आणि साधकांचे आभार मानले पाहिजे. प.पू. डॉ. आठवलेजी हे ईश्‍वर आहेत. ‘आपणही या आश्रमात राहून त्यांची मनोभावे सेवा करावी आणि संतांचे आशीर्वाद घ्यावेत’, असे वाटले.’ – श्री. संभाजी दिनकर भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, कोल्हापूर, महाराष्ट्र. (२१.६.२०१६)

३. आश्रम बघितल्यानंतर मी खरोखर धन्य झालो !

‘आश्रम पाहून खरोखर छान वाटले. हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला आश्रमदर्शनाची संधी मिळायला हवी. हिंदुत्वाचे काम करत असतांना ईश्‍वर आणि संत यांचे आशीर्वाद पाठीशी असणे आवश्यक आहे. आश्रमातील प्रत्येक साधकाचे काम मी घरी आणि इतर पाहुण्यांना सांगून ‘कामासमवेत साधनाही महत्त्वाची आहे’, हे सांगणार आहे. आश्रम बघितल्यानंतर असे वाटले की, खरोखर मी धन्य झालो. घरच्या सर्व मंडळींना घेऊन येऊन मी त्यांना आश्रम दाखवणार आहे. साधना केल्यावर खरोखर समाधान मिळणार आहे. विज्ञानानेही भारतीय संस्कृती तपासली, तरी भारतीय संस्कृतीतच खरे समाधान आहे, हे विज्ञानवाद्यांच्या लक्षात येईल.’ – श्री. अनिल (राजू) यादव, करवीर तालुका प्रमुख, शिवसेना, कोल्हापूर, महाराष्ट्र. (२१.६.२०१६)

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘हिंदु राष्ट्र निर्माण होणार’, याची निश्‍चिती वाटली !

‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून प्रत्यक्ष देवाचे दर्शन झाले. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या धर्माचे रक्षण होऊन संतांच्या अन् प.पू. डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र निर्माण होणार, हे मात्र निश्‍चित !’ – श्री. संभाजी दिनकर भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, कोल्हापूर, महाराष्ट्र. (२१.६.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात