‘घरगुती औषधे’ घेण्याची पद्धत

वैद्य मेघराज पराडकर

‘शास्त्रीय आयुर्वेदामध्ये ‘विकाराची कारणे, त्या कारणांमुळे शरिरावर झालेला परिणाम, तो परिणाम दूर करण्यासाठी करायचे उपचार, रोग्याची प्रकृती, त्याचे राहणीमान, त्याची प्रतिकारक्षमता आदी असंख्य गोष्टींचा सखोल अभ्यास करून रोग्याला लागू पडेल, असे योग्य औषध द्यावे’, असे सांगितले आहे. तज्ञ वैद्यच असे उपचार करू शकतात. तज्ञ वैद्यांच्या अभावी निदान लाक्षणिक आराम मिळावा, यासाठी परंपरेने ‘घरगुती औषधे’ ही फार सुंदर सोय करून ठेवली आहे. ही औषधे वापरण्यास सोपी असतात. यांपासून सहसा अपाय होत नाही; पण अपाय झालाच, तर तो अ‍ॅलोपॅथी औषधांपासून होणार्‍या अपायांएवढा गंभीर नसतो. त्यामुळे आजारी पडल्यावर लगेच अ‍ॅलोपॅथीची औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपचार करून पहावेत. साधारणपणे एकदा घेतलेले कोणतेही औषध आपला सुपरिणाम किंवा दुष्परिणाम २४ घंट्यांमध्ये दाखवतेच; परंतु एका दिवसात हा सूक्ष्म परिणाम लक्षात येणे अवघड वाटत असल्यास ते औषध पुढे ३ दिवस चालू ठेवावे. तरीही काही न समजल्यास जास्तीतजास्त ७ दिवस औषध चालू ठेवावे. ७ दिवस उपचार करूनही काही लाभ न झाल्यास मात्र उपचार बंद करावेत. औषध घेण्याच्या कालावधीत ‘औषधाचा दुष्परिणाम होत आहे’, असे लक्षात आल्यासही औषध बंद करावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१७)

 

१. कुठे अ‍ॅलोपॅथी, तर कुठे आयुर्वेद !

अ‍ॅलोपॅथी आयुर्वेद
१. इतिहास २०० – ३०० वर्षांचा अनादी
२. विषय कालबाह्य होणे / न होणे कालबाह्य होतो; कारण आधीचे संशोधन आणि उपाय काही काळाने योग्य नसल्याचे लक्षात येते. कधीच कालबाह्य होत नाही; कारण यात चिरंतन शास्त्र सांगितले आहे.
३. संशोधनाची आवश्यकता असणे / नसणे सातत्याने करावे लागणे परिपूर्ण असल्याने संशोधन करावे न लागणे
४. रोगांच्या कारणांचा विचार बहुतांशी केवळ तात्कालिक आणि मर्यादित कारणांचा विचार केलेला असणे देश, काळ, ऋतू, प्रकृती यांसह पूर्वजन्मातील कारणांचाही सखोल विचार केलेला असणे
५. निदान पद्धत निदानासाठी यंत्रे, उपकरणे, चाचण्या यांवर अवलंबून रहावे लागणे नाडीपरीक्षणसारख्या अचूक आणि सखोल निदान पद्धती असल्याने बाह्य साधनांवर अवलंबून रहाण्याची आवश्यकता नसणे
६. औषधे आणि त्यांचे दुष्परिणाम कृत्रिम, महागडी आणि महाभयंकर दुष्परिणाम करणारी असणे नैसर्गिक, अतिशय स्वस्त आणि योग्य रितीने घेतल्यास कोणतेही दुष्परिणाम न करणारी असणे
७. स्वरूप व्यापार सेवा आणि ईश्‍वरप्राप्तीचा एक मार्ग
८. आध्यात्मिक अधिष्ठान नसणे असणे
९. जीवनपद्धत म्हणून शास्त्राचा उपयोग होणे शक्य नसणे हिंदु धर्मातील सर्व आचार आयुर्वेदानुसारच असल्याने सहस्रावधी वर्षांपासून आयुर्वेद ही हिंदूंची जीवनपद्धतच असणे

वरील सारणीवरून हिंदु राष्ट्रात आयुर्वेदाला प्राधान्य का देण्यात येईल, हे लक्षात येईल. – (प.पू) डॉ. आठवले (२४.१२.२०१४)

 

२. औषधे देतांना वात, पित्त, कफ यांचा विचार न करता
सर्वांना एकसमान औषध देणारी बालवाडीप्रमाणे असलेली अ‍ॅलोपॅथी !

आयुर्वेदात एखाद्या विकारावर सर्वांना नेहमी एकसारखे औषध नसते. रुग्णाच्या शरिरातील वात, पित्त आणि कफ यांच्या स्थितीनुसार औषध पालटते. असे केल्याने औषधाचे दुष्परिणाम होत नाहीत आणि अपेक्षित गुण येतो. याउलट अ‍ॅलोपॅथीमध्ये असा काही विचारच नसल्याने एखाद्या विकारावर किंवा लक्षणावर सर्वांना एकसमान औषध दिले जाते. यावरून ‘आयुर्वेदापुढे अ‍ॅलोपॅथी बालवाडीप्रमाणे कशी आहे ?’, हे लक्षात येते.

 

३. निरोगी रहाण्याचा सर्वांत सोपा मार्ग : आरोग्य संजीवनी

पुढील न्यूनतम ३ गोष्टींचे नियमित आचरण केल्यास आरोग्य उत्तम रहाते आणि कार्यक्षमता वाढते.

३ अ. पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान उठणे

या वेळेत फुप्फुसे इतर वेळेपेक्षा अधिक चांगली क्रियाशील असतात. या वेळी उठल्याने सर्व शरिराला भरपूर प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होतो. अपानवायूचे कार्य चालू झाल्याने मलनिस्सारण आपसूक होते.

३ आ. जेवण दुपारऐवजी सकाळी ९ ते ११
या वेळेत आणि रात्रीऐवजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत करणे

आपली पचनशक्ती सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. या वेळेत जेवल्यास पचन सुरळीत होते.

३ इ. रात्री ९ ते ११ च्या दरम्यान झोपणे

रात्री १२ पूर्वी घेतलेली १ घंट्याची झोप ही अन्य वेळी घेतलेल्या २ घंट्यांच्या झोपेच्या बरोबर असते. या वेळेत झोपल्याने शांत आणि गाढ झोप लागते. या ३ गोष्टी नियमित केल्यास अन्य कोणतेही ‘विशेष पथ्य’ पाळण्याची आवश्यकता रहात नाही.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२९.१.२०१५)

 

४. आयुर्वेद अनुसरा आणि हिंदु संस्कृतीचे अभिमानी व्हा !

पू. संदीप आळशी‘

तुळस, कोरफड यांसारख्या औषधी वनस्पती घराच्या अंगणात आणि सज्ज्यात (गॅलरीत) कुंड्यांमध्येही लावता येतात. या वनस्पती, तसेच स्वयंपाकघरातील धने, जिरे, ओवा यांसारखे मसाल्याचे पदार्थ यांचा उपयोग ताप, खोकला, पोटदुखी अशा विविध विकारांत होतो. असे असतांना साध्या साध्या विकारांसाठी महागडी ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधे कशाला घ्यायची ? ही औषधे बनवणारी बहुतांश आस्थापने परदेशी असल्याने देशाचा पैसाही परदेशात जातो. ऋषिमुनींनी सांगितलेला आयुर्वेद अनुसरून स्वदेशीचे व्रत पाळणे आणि हिंदु संस्कृतीचे अभिमानी होणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२७.२.२०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment