टीका : सर्व हिंदू शाकाहारी असतात.

अमेरिकेतील प्रख्यात प्रसारमाध्यम ‘सीएन्एन्’च्या संकेतस्थळावर हिंदु धर्मातील सिद्धान्त मिथक (कल्पित) असल्याच्या स्वरूपात दिले आहेत. हे सिद्धान्त मिथक नसून त्यामागे अध्यात्मशास्त्र आहे. हिंदुु धर्मातील धार्मिक परंपरांमागे आणि हिंदूंच्या धर्माचरणामागे अध्यात्मशास्त्रीय आधार असतो. हे शास्त्र आपण जाणून घेतले, तर हिंदु धर्माचे अद्वितीयत्व आपल्या लक्षात येईल.

 

टीका : सर्व हिंदू शाकाहारी असतात.

वास्तव : व्यक्ती सत्त्व, रज आणि तम त्रिगुणांनी बनलेली असते. व्यक्तीमध्ये सत्त्वगुण वाढल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तमोगुणी व्यक्ती काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंच्या आहारी जाते. रजोगुण हा चालना देणारा गुण असल्याने सत्त्वगुणी व्यक्तीला तो सत्त्वगुण वाढवण्यासाठी, तर तमोगुणी व्यक्तीला तो तमोगुण वाढण्यासाठी चालना देतो. ईश्वरप्राप्तीसाठी व्यक्ती सत्त्वगुणी होणे आवश्यक असल्याने हिंदु धर्मातील आचारशास्त्रे, आहार-विहारशास्त्रे, वेषभूषा आणि केशभूषा यांत सत्त्वगुणवृद्धीला महत्त्व आहे. शाकाहारामुळे व्यक्तीमधील सत्त्वगुण वाढतो आणि देहातील तमोगुणाचा लय होतो.

आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी शाकाहारी बनणे अत्यावश्यक नाही. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणारा कोणत्या मार्गाने साधना करत आहे, त्यावरसुद्धा शाकाहाराचे महत्त्व अवलंबून आहे, उदा. हठयोगामध्ये देहशुद्धीला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे हठयोगानुसार साधना करणार्‍याला शाकाहारी असणे आवश्यक ठरते. अध्यात्मशास्त्रानुसार शाकाहाराने व्यक्तीतील ०.०००१ टक्के इतका सत्त्वगुण वाढतो; म्हणून साधारणतः बहुतांश हिंदू शाकाहारी असतात.

कुठे शाकाहाराची शिकवण देऊन पशूहत्येचा निषेध करणारा हिंदु धर्म आणि कुठे स्वतःचे पोट भरण्यासाठी पशूहत्या करून त्यांचे मांस खाणे नैतिक समजणारे स्वार्थी इतर पंथ !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment