आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ परात्पर गुरु डॉ. आठवले !

अध्यात्म हेच अत्युच्च प्रतीचे शास्त्र असल्याची
प्रचीती घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

ppdr_felicitation_400
ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारांवरील संशोधनासाठी जात असतांना मुंबई विमानतळावर झालेला सत्कार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या कालावधीत ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारपद्धतीवर यशस्वी संशोधन केल्यानंतर त्यांची संमोहन उपचारतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती झाली. वर्ष १९७८ मध्ये मुंबईला परतल्यावर त्यांनी मुंबईत मनोविकारांवरील संमोहन-उपचारतज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय चालू केला. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था स्थापली. वर्ष १९७८ ते १९८३ या कालावधीत त्यांनी ५०० हून अधिक आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धांत अन् प्रात्यक्षिके यांविषयी अमूल्य मार्गदर्शन केले.

संमोहन उपचारातील स्वयंसूचनांच्या नाविन्यपूर्ण पद्धती शोधणे

ब्रिटनमध्ये मनोविकारांच्या रुग्णांवर उपचार करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आले की, मनोविकार मूलभूतपणे स्वभावदोष आणि अहं यांच्यामुळे निर्माण होतात. स्वभावाला औषध नसल्यामुळे त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या उपचारपद्धती शोधल्या. त्यांच्या हेही लक्षात आले की, रुग्णांना उपचार करणार्‍यांकडे उपचार करून घेण्यासाठी वारंवार जावे लागते. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसे वाया जातात, तसेच उपचारही होऊ शकत नाहीत. यांवर मात करण्यासाठी त्यांनी स्वयंसूचना उपचारपद्धत शोधली. त्या पद्धतीचा वापर करून रुग्ण स्वतःवर दिवसभरात १० – १५ वेळाही उपचार करू शकत असे. त्यामुळे तो लवकर बरा होत असे.

‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्थे’ची स्थापना आणि तिच्याद्वारे केलेले कार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १.१.१९८२ या दिवशी ‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था (द इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल हिप्नॉसिस अ‍ॅण्ड रिसर्च)’ स्थापन केली. ‘आंतरराष्ट्रीय संमोहन संस्थे’शी संलग्न असलेल्या या संस्थेची ‘वैद्यकीय दृष्टीकोनातून संमोहनशास्त्राविषयी संशोधन करणे आणि भारतात संमोहन उपचार पद्धतीचा करणे’, ही उद्दिष्टे होती. या संस्थेमध्ये ८ ते १० डॉक्टर्स संशोधनरत होते. या संस्थेद्वारे डॉक्टर, दंतवैद्य, मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट) आणि मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी १९८२ ते १९८६ या कालावधीत मुंबई, बडोदा, कोलकाता आदी ठिकाणी संमोहन उपचारशास्त्राचे अभ्यासवर्ग आयोजित करून सुमारे ४०० तज्ञांना देण्यात आले.

संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांवरील ग्रंथसंपदा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले दी इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल हिप्नोसिस् अ‍ॅण्ड रिसर्चचे १ ते ५ भाग (वर्ष १९८३ – वर्ष १९८७), हिप्नोथेरपी अ‍ॅकॉर्डिंग टू दि पर्सनॅलिटी डिफेक्ट मॉडेल ऑफ सायकोथेरपी, संमोहनशास्त्र आणि संमोहन उपचार, सुखी जीवनासाठी संमोहन-उपचार, शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार, लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार, मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (२ भाग), स्वभावदोष निर्मूलन आणि गणु सवंर्धन प्रक्रिया (४ भाग), हे ग्रथं; लोकप्रिय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले त्यांचे १२३ लेख आणि विदेशात कौतुक झालेले शोध-निबंध ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीची, तसेच संमोहन-उपचारांच्या संदर्भातील व्यासंगपूर्ण अन् अद्वितीय संशोधनाची फलनिष्पत्ती आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘संमोहन उपचारांनी सुधारणा होऊ न शकणारे मनोरुग्ण संतांनी सांगितलेली साधना केल्यानंतर बरे होतात’, असा अनुभव आला. त्यानंतर ‘केवळ स्वभावदोष आणि अहं हेच सर्व मनोविकारांचे मूळ कारण नसते, तर ‘प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास’ ही अध्यात्मातील कारणेही अतिशय महत्त्वाची आहेत’, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वर्ष १९८३ ते वर्ष १९८७ या कालावधीत त्यांनी अध्यात्मातील अधिकारी असलेल्या जवळजवळ २५ संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष १९८७ मध्ये त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली.

सुखी जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसाठी उपयुक्त ग्रंथमालिका

१. संमोहन उपचार (इंग्रजी)
२. संमोहनशास्त्र आणि संमोहन उपचार
३. सुखी जीवनासाठी संमोहन-उपचार
४. स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व व गुण-संवर्धन प्रक्रिया
५. स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलन प्रक्रिया
६. स्वभावदोष निर्मूलनासाठी बौद्धिक आणि कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न
७. स्वभावदोष निर्मूलनासाठी आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न

 

आपत्काळात वैद्य, औषधे यांच्या अनुपलब्धतेत उपयुक्त सनातनची ग्रंथमालिका

१. स्वसंमोहन उपचार

२. लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार
बर्‍याचदा रुग्ण स्वतःवर उपचार करू शकत नाही. अशा वेळी कोणतीही अभ्यासू आणि दुसर्‍याला साहाय्य करण्याची वृत्ती असलेली व्यक्ती संमोहन उपचारशास्त्राचा अभ्यास करून रुग्णावर उपचार करू शकते. असे उपचार करणे सुलभ जावे, यासाठी या ग्रंथात विविध लैंगिक समस्यांवर उपचार केल्याची उदाहरणे सविस्तर दिली आहेत.

३. मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग १)
मनोविकारांवरील उपचारपद्धत, संमोहन उपचारपद्धत यांची वैशिष्ट्ये आदींचा उहापोह या ग्रंथात केला आहे. स्वसंमोहनशास्त्राचा वापर करून झोपेत बोलण्याची सवय, भीती आदी मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची उदाहरणे यात दिली असून व्यसनमुक्तीसाठी आणि परीक्षेतील अपयशावर मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

४. मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग २)
संमोहन उपचार पद्धत मनाला निरोगी कसे ठेवायचे, याचे शिक्षण देते. या ग्रंथात संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णावर किंवा स्वतःवर टप्प्याटप्प्याने उपचार करण्याची पद्धत, उपचाराची काळानुसार फलनिष्पत्ती आदींविषयी सविस्तर विवरण दिले असून काही मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणेही दिली आहेत.

५. शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार
स्वतःचे कौशल्य, सामर्थ्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्याच्या प्रयत्नांत संमोहनशास्त्राचा वापर करणे उपयुक्त ठरते. या ग्रंथात संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णावर किंवा स्वतःवर टप्प्याटप्प्याने उपचार कसे करायचे, हे स्थूलपणा, दमा, तोतरेपणा, आकडी येणे आदी विकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आले आहे.