सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !

sanshodhan_logo_dainik_col

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे दत्तमाला मंत्रजप केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी लोलक-चिकित्सेद्वारेे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !

 

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

Madhura_Karve_2012_Col
सौ. मधुरा कर्वे

देवाने ही चराचर सृष्टी निर्माण केली. मनुष्य, प्राणी, पक्षी आणि झाडे-झुडपे यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी वनामध्ये रहायचे. वनातील वनस्पतींचे, फुलांचे आणि झाडांचे महत्त्व त्यांनी ओळखले. माणसाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगराई दूर होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या वनौषधी निर्माण केल्या.

भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर ! अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले आहे, या झाडामध्ये त्रिमूर्तींचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा, मध्यभागात विष्णु आणि अग्रभागात शिवाचे अस्तित्व असते. त्यामुळे या झाडाची पूजा करावी, असे सांगितले जाते.

IMG_2632
औदुंबराच्या रोपांची लोलक-चिकित्सा करतांना सौ. मधुरा कर्वे (गोलाकारात लोलक मोठा करुन दाखवला आहे.)

ही झाडे हवेमध्ये पुष्कळ जास्त प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही हे पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचे झाड आहे. सनातन संस्थेवरील संकटे दूर व्हावीत, यासाठी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाले. त्या दिवसापासून आश्रमात दिवसेंदिवस दत्ततत्त्व वाढत असल्याची प्रचीती साधकांना येत आहे आणि आश्रम परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट झाला आहे. पठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५६ रोपे आपोआप उगवली आहेत. यावरून मंत्रपठणामुळे वातावरण सत्त्वप्रधान होते आणि मंत्रातील तत्त्वानुसार निसर्गातही सकारात्मक पालट होतो, ही गोष्ट सिद्ध होते. अशा या देववृक्षासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने एक वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केले ते पुढे देत आहोत.

तीन ठिकाणच्या औदुंबर वृक्षांचे लोलक-चिकित्सेद्वारे केलेले परीक्षण

tab1tab2
२२ आणि २३.१२.२०१५ या कालावधीत औदुंबर वृक्षाचे लोलक-चिकित्सेद्वारे केलेल्या परीक्षणाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.

टीप १ जेथे औदुंबराचा वृक्ष असतो, तेथील भूमीखाली साधारणपणे पाण्याचा साठा सापडतो, असे मानतात. परीक्षणात या वृक्षाच्या खाली २४ फुटांवर पाणी लागेल, असे आहे.

टीप २ औदुंबराचे वृक्ष साधारणपणे भूमीत खाली पाण्याचा साठा असल्यास, सभोवतालचा परिसर (अथवा वास्तू) सात्त्विक असल्यास किंवा नैसर्गिकरित्या उगवलेले अशा विविध पद्धतीने असू शकतात; परंतु आश्रमाबोहरील वृक्षाच्या संदर्भात अन्य कारण असल्याचा निष्कर्ष लोलक-चिकित्सेने दाखवला. तेव्हा परीक्षण झाल्यावर मनात विचार आला, अन्य म्हणजे काय असू शकेल ? तेव्हा अंतर्मनातून विचार आला, हा वृक्षयोनीतील साधक जीव असून तेथे राहून साधना करत आहे.

टीप ३ सनातन आश्रमातील साधक योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या मार्गदर्शनानुसार दत्तमाला जप करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने औदुंबराची रोपे उगवली आहेत.

भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने परीक्षण करण्याची सेवा मिळाली आणि त्यानेच ती करवून घेतली, यासाठी त्याच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता !

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, फोंडा, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात