सनातनच्या साधकांकडून शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

ठाणे, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील ठाणे येथे कौपिनेश्वर मंदिर, खिडकाळेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर आणि अन्य मंदिरे यांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बर्याच ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त पूजांचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्थेच्या वतीनेही महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात २८ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. ठाणे येथे १३, डोंबिवली येथे १०, बदलापूर येथे ३, कल्याण आणि अंबरनाथ येथे एका ठिकाणी, असे ग्रंथप्रदर्शन अन् विक्रीकेंद्र उभारली होती. जिल्ह्यांतील प्रदर्शनांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.




डोंबिवली येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांनी सदिच्छा भेट देऊन ग्रंथांविषयी जाणून घेतले.
या वेळी सनातनच्या साधकांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या मान्यवरांना २३ आणि २४ मे या दिवशी वरळी, मुंबई येथे होणार्या ‘शंखनाद रामराज्यका’ या भव्य कार्यक्रमाविषयी माहिती देऊन त्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले.
ठाणे येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे आमदार संजय केळकर, तसेच आमदार अधिवक्ता निरंजन डावखरे, महापौर सौ. शर्मिला पिंपोळकर, शिवसेनेचे किरण नाकती यांनी, तर अंबरनाथ येथील शिवमंदिरात लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी भेट दिली.
सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांत महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

सोलापूर – महाशिवरात्रीचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये ५०, बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आणि लातूर जिल्ह्यात २, धाराशिव जिल्ह्यात ६ ठिकाणी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सोलापूरमधील चौपाड येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भाजपचे आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शन पाहून ‘पुष्कळ छान प्रदर्शन लावले आहे’, असा अभिप्राय त्यांनी दिला, तसेच या प्रदर्शनाला सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री. विनायक कोंड्याल आणि त्यांच्या पत्नी यांनीही भेट दिली. प्रदर्शन पाहून ‘पुष्कळ छान उपक्रम आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विजापूर रोड येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर येथे उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी त्यांचे पती श्री. महेश देवकरही उपस्थित होते. प्रदर्शन पाहून ‘प्रदर्शन पुष्कळ सुंदर लावले आहे’, असा अभिप्राय त्यांनी दिला, तसेच या प्रदर्शनाला भाजपच्या नगरसेविका सौ. चैताली शिवराज गायकवाड आणि त्यांचे पती श्री. शिवराज गायकवाड यांनीही भेट दिली. प्रदर्शन पाहून, ‘असे उपक्रम आपल्या भागात राबूया’, असे ते म्हणाले.
अक्कलकोट रोड येथील वीरतपस्वी प्रशाला परिसरातही प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला, तसेच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. निळकंठ चाटे यांच्या शुभहस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. लातूर जिल्ह्यातही २ ठिकाणी अशा प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.
भाविकांना सण-उत्सवांचे शास्त्र समजावे, तसेच राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा लाभ व्हावा, या उद्देशाने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनांना भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनांमध्ये धर्मशिक्षण, बालसंस्कार, साधना, हिंदुत्व, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण इत्यादी विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे भाविकांना आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेण्याची संधी मिळाली.



क्षणचित्र
सोलापूर येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने सर्व भाविकांना निमंत्रण देण्यात आले, तसेच ‘सेल्फी पॉईंट’वर (भ्रमणभाषमध्ये स्वतःचे छायाचित्र स्वतः काढण्यासाठी सिद्ध केलेले ठिकाण) भाविक छायाचित्र काढत होते.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !