
फोंडा, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात हिंदु संस्कृती आणि मंदिरे टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या सौंदेकर राजघराण्याचे वंशज सवाई श्री श्री मधुलिंगनागेश राजेंद्र वडियार यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमातील चालणारे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. या प्रसंगी त्यांची पत्नी राणी निकिताराजे वडियार, त्यांच्या मुली कु. नक्षत्रराजे आणि कु. नभाराजे उपस्थित होत्या. सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

Raja Madhuling Wadiyar & Rani Nikita Wadiyar of the Soundekar Royal Family from Nageshi, Goa, along with their family, visited the Sanatan Ashram at Ramnathi, Goa. They offered heartfelt prayers and shared warm spiritual greetings. pic.twitter.com/YBBXCc0s4O
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) August 30, 2025
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची शिवतीर्थ महालाला भेट
![]()
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी फोंडा येथील नागेशी येथे असलेल्या ऐतिहासिक सौंदेकर राजघराण्याच्या ‘शिवतीर्थ महाला’ला भेट दिली. या वेळी त्यांनी सौंदेकर राजघराण्याचे वंशज सवाई श्री श्री मधुलिंगनागेश वडियार यांच्याशी वार्तालाप करून सौंदेकर राजघराण्याचा इतिहास, तसेच राजघराण्याने जुलमी पोर्तुगीज राजवटीच्या वेळी हिंदु संस्कृती वाचवण्यासाठी केलेले कार्य यांविषयी जाणून घेतले. या वेळी सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तसेच पू. (सौ.) ज्योती ढवळीकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते. |


प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
उप्पळा (केरळम्) येथील कोंडेवूर मठाचे मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला...
सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी