बिंदूदाबन उपायांच्या पाश्चात्त्य आणि पौर्वात्य पद्धती

बिंदूदाबन उपायपद्धत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी वापरली जाते, तसेच सर्वसामान्य मनुष्यप्रकृतीला जडत्व असल्याने तिच्यासाठीही आरोग्यकारक म्हणून बिंदूदाबन पद्धत वापरली जाते. या लेखात बिंदूदाबन उपायांच्या पाश्चात्त्य आणि पौर्वात्य पद्धतींची तुलना केली आहे.

C2_320
१. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राची उपायांची पद्धत

पाश्चात्त्य वैद्यकशास्त्र शरिरातील रोग झालेल्या पेशी आणि त्यांचा प्रकार (उदा. हाडांच्या पेशी, मज्जातंतू, स्नायूतंतू अन् रक्तवाहिन्या यांमधील पेशी इत्यादी) शोधण्यासाठी सूक्ष्म तपासांचा आग्रह धरते. या अभ्यासातून मिळालेल्या अनुमानाच्या आधारावरच रोगावर औषधोपचार केले जातात. बिंदूदाबन उपायांबाबत चिनी पद्धतीच्या प्रभावामुळे पाश्चात्त्यांची उपायांची पद्धतही वरवरची आहे.

 

२. बिंदूदाबनाची पौर्वात्त्य उपायपद्धत आणि तिचे महत्त्व

पौर्वात्य देशातील वैद्यकशास्त्र पुष्कळ निराळे आहे. ते शरिरातील चेतनाशक्तीच्या प्रवाहाला (रेखावृत्तांना) पुष्कळच महत्त्व देते. शरिरातील कोणत्याही भागात वहाणारी चेतनाशक्ती हीच त्या भागाची किंवा त्या अवयवाची कार्य करण्याची मुख्य शक्ती असते. ही चेतनाशक्तीच त्या भागातील / अवयवातील प्रत्येक पेशीचे नियंत्रण करते. त्यामुळे या उपायपद्धतीनुसार शरिरातील कोणत्याही भागात कोणताही रोग उद्भवला असला, तरी त्यावर होणारा उपाय एकसारखाच असतो  त्यामुळेच उपायांची ही पद्धत पुष्कळच साधी अन् सोपी आहे.

 

३. शरिरावर गोंदण्याने होणारे सूक्ष्मातील लाभ

अ. शरिरावर गोंदण काढतांना त्वचेवर दिल्या जाणाऱ्या दाबाबुळे त्या ठिकाणी सत्त्वगुणी चक्र कार्यरत होऊन त्यातून सत्त्वगुणी लहरी निर्माण होतात या लहरींचे शक्तीच्या लहरींत रूपांतर होते आणि नंतर त्यांचे प्रक्षेपण होते. त्यामुळे शरिरावर गोंदलेल्या भागाच्या आजूबाजूला सत्त्वकण पसरतात.

आ. शरिराच्या गोंदलेल्या भागावरील त्रासदायक शक्तीच्या लहरी आणि काळे आवरण दूर होते.

इ. सात्त्विकतेचा परिणाम दीर्घकाळ टिकून रहातो.

ई. पाश्चात्त्यांची ‘टॅटू’ पद्धत : अलिकडे पाश्चात्त्य देशांतून शरिरावर गोंदवून घेण्याची पद्धत रूढ झाली आहे. यामध्ये शरिरावर निरनिराळे चित्रविचित्र आकार आणि प्राणी यांची चित्रे काढली जातात. या गोंदण्याच्या पद्धतीत शरिरावर काढले जाणारे आकार अन् त्यांमागील उद्देश भारतीय गोंदण काढण्याच्या उद्देशाच्या पूर्णतः विरोधी असल्याने टॅटू काढण्याने शरिरात रज-तम लहरींचे प्रक्षेपण होते.

संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’