बिंदूदाबन उपाय करतांना लक्षात येणारी सूत्रे (मुद्दे)

A2_BW

१. निदान आणि उपाय यांचे बिंदू एकच असणे

ज्या बिंदूंच्या साहाय्याने एखाद्या रोगाचे निदान केले जाते, त्याच बिंदूंवर उपाय केल्याने रोग दूर होतो. काही वेळा निश्चित निदान करता येत नाही, तर अनुमान केले जाते. या अनुमानाच्या आधारे उपाय केल्यावर रोग दूर होतो अन् निदानासाठी केलेले अनुमान योग्य असल्याचे लक्षात येते.

 

२. रोगनिवारणासाठी काही बिंदू महत्त्वाचे असणे

शरिरातील एखादा अवयव रोगग्रस्त झाला, तर त्या अवयवासाठी असलेल्या असंख्य बिंदूंपैकी कोणते बिंदू दाबावेत, हा प्रश्न महत्त्वाचा असतो. रोगग्रस्त अवयवाशी संबंधित चेतनाशक्तीच्या प्रवाहाच्या मार्गावरील विविध बिंदूंपैकी काही बिंदू रोगनिवारणासाठी अधिक महत्त्वाचे असतात.

 

३. काही बिंदू रोगनिवारणासाठी
अधिक महत्त्वाचे असण्यामागील कारणे

१. कित्येक बिंदूंमध्ये चेतनाशक्तीच्या प्रवाहात अत्यंत सहजतेने अडथळे निर्माण होतात.

२. काही बिंदूंचे चेतनाप्रवाहाचे मार्ग (रेखावृत्ते) त्वचेला अगदी लागून असतात.

३. कित्येक बिंदूंच्या खाली हाडासारखा कठीण भाग असतो. त्यामुळे त्या बिंदूंवर सहजतेने आणि व्यवस्थितपणे दाब देता येतो.

४. कित्येक बिंदू अगदी सहजपणे शोधता येतात आणि त्यांवर उपायही सहजपणे करता येतात.

५. कित्येक बिंदू अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांवर दाब दिल्याने शीघ्र गतीने रोगनिवारण होते.

संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’