श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांचे सनातनला आशीर्वाद !

karnatak_Santi_bhet
प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांना साप्ताहिक सनातन प्रभातची माहिती सांगतांना सनातनच्या सौ. विदुला हळदीपूर

       हुबळी (कर्नाटक) – श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी माझे सनातनला आशीर्वाद आहेत, असे उद्गार काढले. येथील सनदी लेखापाल श्री. चंद्रशेखर दवळीक यांच्या घरी झालेल्या या भेटीत सनातनच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी स्वामीजींना साप्ताहिक सनातन प्रभात विषयी माहिती सांगितली. कर्नाटक शासन राज्यात करत असलेल्या प्रास्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी स्वामीजींना माहिती दिल्यावर ते म्हणाले, या कायद्याविषयी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि त्यांना हा कायदा न करण्याविषयी सांगीन. गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात नुकत्याच पार पडलेल्या उच्छिष्ट गणपती यज्ञाविषयी त्यांना माहिती दिली. या प्रसंगी सनातनचे श्री. अशोक भोज, सौ. गीतांजली काडीवाळ, आदी साधक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात