रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

यज्ञ पार पडल्यानंतर नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

सनातन संस्थेच्या आश्रमात २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला. हा याग ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, ‘सनातन संस्थेच्या साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’ आणि ‘लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने करण्यात आला. या यागाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केले. या यागाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या अन्य संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.

पूजन केलेली घंटा

या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महर्षींच्या आज्ञेने आश्रमात स्थापन होणार्‍या घंटेचे पूजन केले. यानंतर पुरोहितांनी ती घंटा श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन केली.

Leave a Comment