आध्यात्मिक स्तरावरील उपायांसंदर्भात साधकांना सूचना !

‘सनातनचे संत, ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे साधक आणि अन्य साधक त्यांना होणार्या शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधतात. या पद्धतीनुसार कुंडलिनी शक्तीच्या प्रवाहातील अडथळे शोधून प्रत्यक्ष उपाय करतांना शोधलेल्या स्थानांवर मुद्रा करून न्यास करावा लागतो. त्या वेळी काही घंटे उपाय करायचे असल्यास हात दुखायला लागतात. आजारी, वयस्कर किंवा शारीरिक त्रास असणार्या साधकांना अशा प्रकारे शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नाही. अशा वेळी स्थुलातून अशा कृती न करता आपण शोधलेल्या स्थानावर मानस न्यास आणि मुद्रा करावा.’– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
हिंदूंनो, काळानुसार साधना म्हणून श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र यांचे प्रतिदिन पठण करा !
साधकांनो, काळानुसार साधना म्हणून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप...
अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !
आध्यात्मिक त्रासांचे प्रकार
‘डिसीझ एक्स’ या घातक अशा संभाव्य महामारीवर करावयाचा नामजप