‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’सारख्या यंत्रांद्वारे अल्प वेळेत अन्न शिजवण्याच्या पद्धतींचे आहारावर दुष्परिणाम !

Article also available in :

(प्रतिकात्मक छायाचित्र)

१. ‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या यंत्रांत निर्माण झालेली पोकळी रज-तमात्मक लहरींचे भोवरे आतल्याआत निर्माण करत रहाते. हे भोवरे अन्नघटकांमध्ये फेकले जात असतात.

२. विद्युत दाबाचा उपयोग करून विद्युतभारातील वेगाला एका विशिष्ट ऊर्जेखाली दाबून ठेवून त्याद्वारे किंवा वाफेच्या साहाय्याने दाबतंत्र अवलंबल्यामुळे आधी अन्नघटकांतील जीवनसत्त्वयुक्त पोकळ्यांचे एकाच वेळी आणि अतीवेगाने आकुंचन होण्यास प्रारंभ होतो.

३. या यंत्रातील सूक्ष्म किरणे त्यातील अतीसंवेदनशील जीवनतत्त्वांचा नाश करतात.

४. त्यानंतर अतीदाबतंत्रामुळे अन्नातील सूक्ष्म पोषक रसांच्या पोकळ्या रज-तमात्मक स्पंदनांनी भरू लागतात.

५. मनुष्य विज्ञानाच्या बळावर ‘अन्न शिजवणे’, या प्रक्रियेतील वेळ न्यून करण्यास जातो; परंतु आपले आयुष्यमानच न्यून करून घेतो. अल्प कालावधीत अन्न शिजवतांना अन्नातील पोषणविषयक रसांचा अल्प काळातच र्‍हास झाल्याने त्यात शिजण्यासाठी वेळ लागण्यासाठी काही उरतच नाही. त्यामुळे अन्न अल्प कालावधीत शिजून सिद्ध (तयार) झाल्याच्या आनंदात मनुष्य रहातो आणि कित्येक जन्मांनंतर मिळालेल्या मानवी देहाची अतोनात हानी करून घेतो.

६. ही यंत्रे कर्करोगांना आमंत्रित करतात.

७. अल्प कालावधीत अन्न शिजवणारी यंत्रे दीर्घकाळ अन्नात तमोगुणाचे संवर्धन करत रहातात. या तमोगुणाच्या वर्धनामुळे मनुष्यावर मानसिक, तसेच आध्यात्मिक स्तरावरही परिणाम होऊन त्याला अनेक प्रकारच्या मानसिक स्तरावरील विवंचना ग्रासतात आणि यामुळे आध्यात्मिक स्तराचा त्रास म्हणून वाईट शक्तींच्या आक्रमणांनाही बळी पडावे लागते.

८. यंत्राद्वारे अन्नात संक्रमित झालेला नाद हळूहळू सर्व पिंडाला व्यापू लागतो आणि त्यानंतर कालांतराने त्या त्या ठिकाणी रज-तमात्मक लहरींचे स्थान बनून घनीभूत होतो. अशा प्रकारे ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’मधील अन्नसेवनाने देहात विविध ठिकाणी काळ्या शक्तींची स्थाने निर्माण होतात. कालांतराने या स्थानांच्या साहाय्याने देहात वायूमंडलातील वाईट शक्ती शिरकाव करून त्या ठिकाणीच वास करतात. अशा प्रकारे हळूहळू जीव या यंत्रातील अन्न सेवन करून वाईट शक्तींच्या त्रासाला नित्याचा बळी पडतो.

९. ही यंत्रे संपूर्णतः मानवी जीवनाचा, तसेच एकूणच समाजव्यवस्थेचाही र्‍हास करतात.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

अन्नातील सात्त्विकतेचा विज्ञानात विचार नाही !

आमचे विज्ञान शरिराच्या विकासाकरिता अन्नाचा उपयोग असल्याचे सांगते, त्या पलीकडे ते जात नाही. अन्नाने मन बनते. अन्न शाकाहारी आणि सात्त्विक असेल, तर मन आणि बुद्धी सात्त्विक होते. अन्नातील सूक्ष्म भागाच्या परिणामाचा विज्ञानात काही विचार नाही. सात्त्विक अन्नामुळेच योगसाधना होते आणि ईश्‍वराची प्राप्तीसुद्धा होते.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’सारख्या यंत्रांद्वारे अल्प वेळेत अन्न शिजवण्याच्या पद्धतींचे आहारावर दुष्परिणाम !”

  1. फार महत्वाची माहिती मिळाली. अन्नातील सात्विकता, मायक्रोवेव्ह ओव्हन व प्रेशर कुकर चे दुष्परिणाम.. इत्यादी तपशीलवार वर्णन केलेले आहे,, ते अंगीकार करने योग्य आहे

    Reply

Leave a Comment