रामायण हा भारताचा अमूल्य ठेवा आणि इतिहास आहे. आधुनिकांनी कितीही नावे ठेवली आणि त्यांचे अस्तित्व अमान्य करण्याचा प्रयत्न केला, तरीही रामायण काळातील विविध घटनांची ही छायाचित्रे या इतिहासाची साक्ष देतात. रामायणाचा काळ हा त्रेतायुगातील म्हणजे लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे. त्यातून हिंदु संस्कृतीची महानता, प्राचीनता यांचाही प्रत्यय येतो. येथे रामायण काळातील श्रीलंकेतील स्थाने विशेष करून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा सीतामातेच्या अपहरणानंतर तेथील वास्तव्याचा पुरावाच आहे.




शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी…
त्रेतायुगात श्रीरामाने त्याच्या प्रजेसह अयोध्येतील याच शरयू नदीत जलसमाधी घेतली होती, तर कलियुगात रामजन्मभूमी आंदोलनासाठी वर्ष १९९० मध्ये अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. नंतर कारसेवकांचे मृतदेह याच नदीत फेकले होते.

बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम मंदिर !
श्रीरामावतार होण्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ याग करणारे शृंगीऋषि यांच्या बागी (हिमाचल प्रदेश) येथील तपोभूमी
सम्राट विक्रमादित्याने अयोध्या येथे स्थापन केलेल्या प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन !
शरयु तिरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी !
प्रभु श्रीरामचंद्रांच्या सहवासाने पावन झालेल्या अयोध्यानगरीतील पवित्रतम वास्तू !
लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या टोकापर्यंत असलेला रामसेतु : श्रीरामाशी अनुसंधान...