रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

Article also available in :

 संकेतस्थळांवर वायफळ चर्चा !

रामायण न वाचता त्याविषयी हिंदूंच्या
मनात संभ्रम निर्माण करण्याचे हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र !

नवी देहली : सामाजिक संकेतस्थळांवर श्रीरामाच्या संदर्भात एक संदेश सध्या प्रसारित होत आहे. फेसबूकवर प्रसारित झालेल्या या संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्‍याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोचले होते. त्यामुळे दसर्‍यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. प्रभु श्रीरामचंद्र पुष्पक विमानाने अयोध्येला पोचले, असा रामायणात उल्लेख आहे. ‘पुष्पक हे अतिशय वेगवान होते. तरीही त्याला अयोध्येत पोचायला २१ दिवस कसे लागले ?’, असा हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करून ‘रामायण हे काल्पनिक कसे आहे’, असा अपसमज पसरवण्याचा हिंदुद्रोह्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

 

प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रवासाविषयी अनेक तर्क-वितर्क

१. श्रीलंकेपासून अयोध्या २ सहस्र ५८६ किमी दूर आहे. इतक्या दूर पायी जायचे म्हटले तरी २१ दिवस (५१४ घंटे) लागतील. म्हणजे प्रतिदिन सुमारे १२३ किमी चालावे लागेल. याचा अर्थ न थांबता प्रत्येक घंट्याला ५ किमी अंतर चालावे लागेल.

२. दुसरीकडे काही लोकांनी म्हटले आहे की, श्रीराम पायी न जाता पुष्पक विमानाने श्रीलंकेवरून अयोध्येस पोचले होते. गुगलवर रामाचा हा मार्ग दाखवण्यात आलेला आहे. गुगलवर श्रीलंकेच्या डमबुल्ला-चांदनापासून हा मार्ग चालू होतो. तेथून तो किंबिसा, गलकुलामा, मिहिंटाले, मेडवाछिया, तलाईमन्नारपर्यंत पोचतो. त्यानंतर समुद्रातून रामेश्‍वरपर्यंत पोचतो.

३. काहींच्या मते श्रीराम भारतात रामेश्‍वरपासून कुंबोकोणम, कांचीपुरम्, तिरूपती, नेल्लोर, ओंगले, सूर्यापेटपर्यंत पोचले. तेथून महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर वरून मध्यप्रदेशच्या सिवनी, जबलपूर, कटनी, रीवापर्यंत, त्यानंतर उत्तरप्रदेशच्या प्रयाग, सारोन, प्रतापग, सुल्तानपूर, रेहट वरून अयोध्येला पोचले.

४. संकेतस्थळ क्योरावर (www.quora.com) याविषयी वर्ष २०१५ पासून चर्चा चालू आहे. यावर कित्येक लोकांनी मतप्रदर्शन केले आहे.

 

पुष्पक विमानाने प्रवास करूनही प्रभु
श्रीरामचंद्रांना आयोध्येत पोचायला २१ दिवस का लागले ?

रावणाचा वध केल्यानंतर रामाने आदरपूर्वक त्याचा अंत्यसंस्कार बिभीषणाच्या हस्ते केला. त्यानंतर बिभीषणाचा राज्याभिषेक करण्यात आला. रावण हा ब्राह्मण असल्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागू नये; म्हणून रामाने विधी केला. त्यानंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण हे पुष्पक विमानाने अयोध्येत परतले. वाटेत ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात थांबले, त्यानंतर नंदीग्राममध्ये जाऊन भरताची भेट घेतली.

रावणवध ते अयोध्येत आगमन या कालावधीत श्रीरामाने काय काय केले, याचे सविस्तर वर्णन रामायणात आहे. असे असतांना रामायणाचे वाचन न करता बिनबुडाच्या चर्चा घडवून रामायणाविषयी संभ्रम निर्माण करणारे हिंदुद्रोहीच होत. हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यास वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

दिवाळीविषयीचे लघुपट पहा !