हिमाचल प्रदेशातील भलेई माता मंदिरातील मूर्तीला घाम आल्यास मनोकामना पूर्ण होत असल्याची भक्तांची श्रद्धा !

Article also available in :

संशोधकांनी याचे संशोधन
करून त्यामागील कार्यकारण भाव उघड करावा !

bhalei-mata-temple

शिमला – हिमाचल प्रदेशातील भलेई माता मंदिरच्या संदर्भात येथील भक्तांची श्रद्धा आहे की, येथील देवीच्या मूर्तीला घाम आल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते. घाम येणे हे त्यामागील संकेत आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यापासून ४० किमी अंतरावर असलेले हे मंदिर शेकडो वर्षे प्राचीन आहे. येथील भ्राण नामक ठिकाणावरील विहिरीत देवी प्रकट झाली होती. तत्कालिन राजा प्रतापसिंह यांना देवीने स्वप्नांत दृष्टांत देऊन चंबा येथे तिची स्थापना करण्यास सांगितले. राजा जेव्हा तेथून देवीची मूर्ती घेऊन येत होते, तेव्हा तिला भलेई स्थान आवडले आणि तिने पुन्हा दृष्टांत देऊन तेथेच तिची स्थापना करण्यास सांगितले, अशी मूर्तीच्या स्थापनेमागील आख्यायिका सांगितले जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात