विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या !

Article also available in :

न‍वरात्रीच्या काळात विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने चैतन्यदायी प्रदर्शन लावण्यात येत आहेत. सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनात चैतन्यदायी अशी उत्पादने आणि राष्ट्र-धर्माविषयी, तसेच अध्यात्मविषयी ग्रंथांचा समावेश आहे.  तरी भाविकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.


पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर

ग्रंथप्रदर्शनाचे नारळ वाढवून उद्घाटन करतांना श्री. अचल जैन

पुणे – नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी चतुःश्रृंगी मंदिर २४ घंटे दर्शनासाठी खुले रहाणार आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी मंदिर हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.

चतुःश्रृंगी मंदिरात सनातन संस्थेकडून आध्यात्मिक ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

सनातन संस्थेच्या वतीने चतुःश्रृंगी मंदिर परिसरात चैतन्यदायी आणि आध्यात्मिक ग्रंथप्रदर्शन कक्षाचे आयोजन करण्यात आले आहे.  सनातन संस्थेचा प्रदर्शनकक्ष ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत खुला असणार आहे. भाविकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.


श्री तुळजाभवानी देवस्थान, चिंचवड (पुणे)

चिंचवड (पुणे) – ‘श्री तुळजाभवानी देवस्थानाच्या वतीने या ९ दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचा भावपूर्ण आणि उत्साहपूर्वक वातावरणात प्रारंभ या वेळी करण्यात आला. भाविकांचासुद्धा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रदर्शनकक्ष

भाविकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने चैतन्यदायी प्रदर्शन !

प्रदर्शनकक्ष

सनातन संस्थेच्या वतीने चैतन्यदायी अशी उत्पादने आणि राष्ट्र-धर्माविषयी, तसेच अध्यात्मविषयी ग्रंथांचे प्रदर्शन ‘श्री तुळजाभवानी देवस्थान, आकुर्डी’ येथे लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले रहाणार आहे. तरी भाविकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ७०३८७१३८८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.