सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !

सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याकारणाने पालकांना आपल्या पाल्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा होईल ? असा प्रश्न पडतो. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात येत आहे.

विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !

मुंबई येथील जागृत आणि स्वयंभू श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सनातनच्या साधकांनी गणेशाच्या चरणी श्री राजमातंगी महायज्ञाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली.

फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !

सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक भाविकांना या यज्ञाचा लाभ व्हावा, यासाठी मुंबई आणि उपनगर यांमध्ये फलक अन् डिजिटल स्क्रीन यांद्वारे अत्यंत प्रभावी प्रचार होत आहे.

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते मुंबईत श्री महागणपति आणि भूमी पूजन !

श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते ७ मे या दिवशी यज्ञाच्या नियोजित पटांगणावर विघ्नहर्ता श्री महागणपति आणि भूमाता यांचे पूजन करण्यात आले.

इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देहलीच्या ऐतिहासिक परिसरात आयोजित ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सव (आय.सी.एफ्. २०२६)’ हा भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा एक अनोखा संगम ठरला. या महोत्सवात सनातन संस्थेने आयोजित केलेले ग्रंथप्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

या वेळी त्यांनी गोष्टी सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.डी. कांबळे यांनी केले.

देव, देश, धर्म रक्षणासाठी कृतीशील आणि ठोस संघटन आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’, ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि ‘वक्फ बोर्डा’द्वारे भूमींचा दुरुपयोग यांसारख्या समस्यांवर व्यापक जागृती अन् कायदे आवश्यक आहेत. हिंदु समाजासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करून आध्यात्मिक बळ वाढवायला हवे……..

युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !

भारताच्या विजयासाठी, तसेच सैनिकांसह देश-विदेशातील साधक आणि समस्त धर्मप्रेमी यांच्या रक्षणासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ३५ पुरोहितांद्वारे शतचंडी याग पार पडला.

आतंकवादी आणि पाकिस्तान यांना धडा शिकवा !

उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.

आनंदप्राप्तीसाठी धर्माचरण आवश्यक ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल….