सूक्ष्मातील जाणण्याची अलौकिक क्षमता असलेले उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !

उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांनी २ डिसेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. वैभव माणगावकर यांनी त्यांना आश्रमात चालणा-या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.

भांडुप आणि मुलुंड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर

सनातन संस्थेच्या वतीने भांडुप (पूर्व) येथील अवी क्लासेस येथे आणि मुलुंड येथील रिचमंड इंटरनॅशनल प्रिस्कूलमध्ये १ डिसेंबर या दिवशी ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर घेण्यात आले.

सनातन संस्थेच्या कार्यास हिंदुत्वनिष्ठ उद्धव ठाकरे पाठिंबाच देतील !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व जपले. अशा हिंदुत्वाच्या मुशीतच श्री. उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. सनातन संस्था हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घाला !’ – काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी ‘सनातन संस्था महाराष्ट्रात आतंकवाद पसरवते’, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत तिचा सहभाग आहे,’ असे आरोप करून या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्रातील नव्या सरकारकडे केली आहे.

सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे दर्शन !

सध्या पुरी येथील पुर्वाम्नाय गोवर्धन पिठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी  निश्चलानंद सरस्वती दक्षिण भारताच्या दौ-यावर आहेत. उडुपी येथे ते आले असता सनातन संस्थचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.

देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात हरिनाम दिंडीचे आगमन

व्यसनमुक्ती आणि षड्विकार निर्मूलन या उदात्त हेतूंनी देवद गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केल्या जाणा-या ‘हरिनाम दिंडी’चे मार्गशीर्ष शुक्ल पक्षपंचमीला (१ डिसेंबर) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले.

‘सनातन डॉट ऑर्ग’या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य !

सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणा-या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक राहतात. त्यांपैकी काही जणांना हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी आहेत. असे रुग्ण आणि वृद्ध यांसाठी आश्रमात पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.

शालेय शिक्षणामध्ये मानसिक आरोग्याला महत्त्व द्यावे

‘बी द चेंज’ या पहिल्या मानसिक आरोग्य परिषदेत पालक-शिक्षक, मानसोपचारतज्ञ सहभागी झाले होते. ‘बौद्धिक विकासापेक्षा मुलांच्या भावनिक विकासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे’, असे आदित्य बिर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका सिन्हा म्हणाल्या.

शास्त्र जाणून साधना केल्यास जीवन आनंददायी होते – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

येथे २३ नोव्हेंबरला सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रेमी महिलांसाठी ‘साधना’ विषयावर मार्गदर्शन आणि शंकानिरसन आयोजित करण्यात आले होते. याचा लाभ ३५ महिलांनी घेतला.