सत्संग १९ : अयोग्य विचार आणि भावना यांवर अ-१ पद्धतीने स्वयंसूचना कशा बनवाव्यात ?
अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे सूत्र आहे, ‘अयोग्य कृती / विचार / भावना + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम यांची जाणीव + योग्य कृती !’ याप्रमाणे आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला आपल्या मनात येणारे अयोग्य विचार, तसेच भावना यांना योग्य दिशा देता येऊ शकते.