संतांचे वाङ्मय आणि चरित्र यांचा अभ्यास करण्याचे महत्त्व

संतांचे वाङ्मय आणि संतांच्या चरित्राचा ग्रंथ साधकाने जवळ ठेवला, घरी ठेवला, डोक्याखाली घेऊन झोपला किंवा त्याचा थोडासा अभ्यास करून त्यानुसार लगेच कृती केली, तर त्याच्यातील चैतन्याने साधकामध्ये आमूलाग्र पालट होऊन त्याचेही चरित्र घडते, असे मला गुरुकृपेने प्रत्यक्ष अनुभवायला आले.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘माणसाच्या देहातील आत्माराम गेला, शरिरातील पंचमहाभूते निघून गेली की, त्या शरिराला ‘मढे’ म्हणतात. माणसाच्या आत पुष्कळ घाण आहे. विटाळाचा बनलेला हा देह मेल्यावर स्मशानभूमीमध्ये न्यावाच लागतो आणि नष्ट करावाच लागतो. मग तो गोरा असो कि काळा, राजा असो कि राणी असो ! सगळे जेवढे धरतीवर जन्माला आले, त्यांचे शेवटचे ठिकाण स्मशानभूमी !’

हरिद्वार येथील सप्तसरोवर मार्गावर पेशवाईंचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !

सनातन संस्थेसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री आदिनाथ आखाड्याच्या पेशवाईचे (मिरवणूक) स्वागत सप्तसरोवर मार्गावर करण्यात आले. या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येत्या ५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. सध्या मकर राशीत असणारा हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील १३ मास गुरु ग्रह या राशीत रहाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन ही महत्त्वाची घटना मानली जाते. या परिवर्तनाचा प्रभाव व्यक्ती, समाज आणि देश यांच्यावर होत असतो.

सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशलहरींचा सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. कल्पना थोरात, सनातन संस्था

आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करणे आणि त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता असून ते पालकांचे मुख्य कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना थोरात यांनी केले. त्या ‘ऑनलाईन बालसंस्कार वर्गाच्या विशेष भागा’त बोलत होत्या.

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

या वेळी स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती साधकांना आशीर्वाद देतांना म्हणाले, ‘‘तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही सदैव निरोगी रहाल. तुमच्यामध्ये आनंद आहे, तुम्ही सर्व सेवा अत्यंत भावपूर्ण करत आहात. तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांना भेटून मला आनंद झाला…

विशेष सेवेविषयी सनातनच्या साधिका प्रधान चल तिकीट परीक्षक अमरजा आठल्ये रेल्वेकडून सन्मानित !

रेल्वेतील विशेष सेवेविषयी मध्य रेल्वेच्या प्रधान चल तिकीट परीक्षक आणि सनातनच्या साधिका सौ. अमरजा आठल्ये यांना रेल्वे प्रशासनाकडून विशेष पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

कुंभमेळा भारताची सांस्कृतिक महानता दर्शवतो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

कुंभमेळा हा हिंदूंचे विश्वातील सर्वांत मोठे धार्मिक पर्व असून तो भारताची सांस्कृतिक महानता दर्शवणारा आणि सत्संग (संतांचा सत्संग) देणारे हे आध्यामिक संमेलन आहे. हा कुंभमेळा सत्युगापासून प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे प्रती १२ वर्षांनी भरतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.