योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन आत्मबळ वाढवतात !

गरीबात गरीब भारतियालाही आध्यात्मिक दृष्टीकोन माहीत असतात; उदा. ‘जीवनात येणारे दुःख हे प्रारब्धामुळे असून ते भोगून संपवण्यासाठी हा जन्म आहे.’ हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन सहनशीलता पुष्कळ प्रमाणात वाढवतो, सहन करण्याची क्षमता वाढवतो.

व्यक्तीचे आत्महत्येमागील कारण आणि तिला लागणार्‍या पापाचे प्रमाण अन् संतांचा देहत्याग

सामान्य व्यक्तीने काही कारणांमुळे आत्महत्या केली, तर तिला पुष्कळ, मध्यम किंवा अल्प प्रमाणात पाप लागते; मात्र संत देहत्याग करतात तेव्हा त्यांचा उद्देश वेगळा असल्याने पाप लागत नाही.

मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात घेऊन मनःशांती मिळवा !

अमेरिका किंवा पाश्चात्त्य देश आर्थिकदृष्ट्या कितीही समृद्ध झाले असले, तरी त्या देशांमधील लोकांना शांती आहे का ? त्या देशांमध्ये चो-यामा-या, दरोडे, एकमेकांना फसवणे बंद झाले आहे का ? श्रीमंती म्हणजे शांती नव्हे. श्रीमंत माणूस शांत झोपू शकतो का ? तसेच शस्त्रास्त्रांनी शक्तीशाली असणे म्हणजेही शांती साधणे नाही.

आत्महत्या करणारा निंदनीय ! – संत तुकाराम महाराज

अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे. यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, ‘बाबांनो, का जीव देता ? मरण तर ठरलेलेच आहे, मग मुद्दाम मरण का स्वीकारता ?

आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

‘प्रतिदिन होणार्‍या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. ‘जीवनातील ८० टक्के दुःखांची मूळ कारणे ही आध्यात्मिक असून त्यांच्यावर केवळ साधनेने मात करता येते’, असे अध्यात्मशास्त्र सांगते.

आस्तिक दीर्घायुषी असतात ! – अमेरिकेत संशोधन

नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची दीर्घायुषी होण्याची शक्यता अधिक असते. आस्तिक लोक नास्तिकांपेक्षा सरासरी ४ वर्षे अधिक जगतात, असे अमेरिकेतील ‘सोशल सायकॉलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स’ या नियतकालिकात संशोधन प्रकाशित झाले आहे.

कोरोनासारख्या महामारीतही स्थिर रहाण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे हा महत्त्वपूर्ण उपाय ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते.

आत्महत्या करणे हे महापाप असून साधना करणे हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

मित्रांनो, मनुष्यजन्म ही ईश्‍वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्याच वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी लहान वयातच युद्धाला आरंभ केला. त्यांच्यावरही अपयशाचे कठीण प्रसंग आले; परंतु ते कधीच खचले नाहीत.

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति् (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आलेल्या धर्मध्वज स्थापना विधीची छायाचित्रमय क्षणचित्रे !

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या विधीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.

आत्मबळ कसे असावे ?

आत्मबळ कसे असावे ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना २० वर्षांत कष्ट करून मिळवलेले एका वर्षात गमवावे लागले. अशा कठीण परिस्थितीतही महाराजांचे आत्मबळ दृढ होते.