सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे. त्यातील काही लिखाण ग्रंथस्वरूपात प्रकाशित झाले आहे, तर काही लिखाण प्रकाशित होणे बाकी आहे.

जनहो, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल’, अशी घातक मानसिकता पालटा आणि जीवनाचे सार्थक करण्यासाठी साधनेला आरंभ करा !

साधकांनी आपत्काळाच्या सिद्धतेविषयी समाजातील व्यक्तींना सांगितल्यास सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल, असे ते सांगतात. साधकांनी त्यांच्या नातेवाइकांना याविषयी सांगितल्यावर ‘तेही असेच उत्तर देतात’, असे लक्षात आले. तेव्हा मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

सनातनचे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा आज  वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी संतपदी विराजमान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सांगितलेला त्यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती न्यून होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते.

कोरोनासह प्रत्येक व्याधीवर उपचार करतांना त्यामागील आध्यात्मिक कारणांचा विचार होणे आवश्यक ! – डॉ. ज्योती काळे, सनातन संस्था

कोरोनाची पहिली लाट संपते ना संपते, तोच दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाःकार माजवला आहे. आता अन्य बुरशीजन्य आजारही येत आहेत. काही कालावधीने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, तसेच वर्षभर वादळ, पूर अशी संकटांची मालिका चालूच आहे. कोरोनावर उपचार करतांना औषधे, ऑक्सिजन, लस हे सर्व उपलब्ध होऊनही लोकांचे मृत्यू होत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनासह उपचार करणारे डॉक्टरही परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत.

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ या ग्रंथाचे पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांच्या शुभ हस्ते प्रकाशन !

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा २६ मे या दिवशी, म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असलेल्या योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या कल्याण येथील ‘अदृश्य छाया’ या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात पार पडला. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी पू. प्रमिला वैशंपायन यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

देवर्षि नारद

देवर्षि नारद हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. हिंदु धर्मात त्यांना ब्रह्माचे पुत्र मानले जाते. नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत.

दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी माहिती आवश्यक आहे.