दत्त जयंती निमित्त नवी मुंबई, मुंबई, पालघर येथे सनातनने उभारलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा सहस्रावधी जिज्ञासूंनी लाभ घेतला

दत्त जयंती निमित्त १३ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, नवी मुंबई येथे ५० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे ग्रंथ खरेदी केले. येथील ग्रंथकक्षावर शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी भेट दिली.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये अध्यात्मप्रसार ! इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंनी भेट दिली. ‘श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !’ असे पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज) यांनी गौरवोद्गार काढून आशीर्वाद दिले.