जागतिक महामारी पसरवणार्‍या ‘कोरोना विषाणूं’नंतर आता आलेल्या ‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी हा नामजप करा !

‘वर्ष २०२० पासून जगभरातील लोकांवर ‘कोरोना विषाणूं’चे संकट आहे आणि २ वर्षे होत आली तरी अजूनही त्या विषाणूंची लागण लोकांना होतच आहे. त्यात आता ‘ओमिक्रॉन’ नावाचा नवीन विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना

आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही.