अबू धाबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’च्या उद्घाटन कार्यक्रमात सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सहभागी !

अबू धाबी – येथील वाळवंटात बांधण्यात आलेले आणि पश्‍चिम आशियातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे उद्घाटन १४ फेब्रुवारी या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झाले. मंदिराचे पदाधिकारी श्री. रवींद्र कदम यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मंदिराच्या वतीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण पाठवले होते.